पान:मजूर.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १८ वें बाकी, खरी संतुची बहिण आहेस, अगदी त्याच्या इतकचि हट्टी, आणि चढेल आहेस ! माझ्या सरळ सांगण्यानें एकादें जनावर वळले असत ! विनवणीनें दगडाला घाम फुटला असता ! पण तूं आपल्या वळ णावरच जाते आहेस ! सुगंधा, अजून तुला कल्पना नाहीं, मी किती डेंजरस आहे त्याची ! माझ्या इच्छेच्याविरुद्ध गेलें-मला चिडविलें, मला दुखविलें, माझी मानहानी केली, म्हणजे मी काय करतों, काय करीन याची जर तुला थोडी जाणवि देईन - तर तुझा हा हट्ट केव्हांच तुला सोडून जाईल ! सुगंधा, मी तुझा, तुझ्या आयुष्याचा सुगंध लुटणारच ! हे आजच नाहीं ठरविलें ! तुला पहिल्यांदा पाहिले त्या दिवसापासून ठर विलें आहे ! या माझ्या निश्चयांत आजपर्यंत पुष्कळ अडथळे आले- पण मी ते दूर केले. तूं शेवटी इतका त्रास देशील असे मला वाटलें नव्हते ? माझ्या सहनशीलपणाचा जास्त अंत घेतलास – माझें मुका- ट्यानें ऐक - " 66 मी:- काय तुझ्यासारख्या चांडाळाच्या पापी इच्छेला बळी पडूं ? मॅने २ - होय. तेंच मीं मघांपासून सांगतो आहे ! मी:- पापी राक्षसा, तूं शुद्धीवर आहेस का ? मॅनेजर: – मुळीच नाहीं. असले कांहीं करावयाचें असले म्हणजे मी शुद्धीवर असत नाहीं ! मी अशा वेळीं तयारीनेंच असतों ! शुद्धीवर असल्यावर माझ्यांत ताकदही असत नाहीं, आणि युक्तीही सुचत नाहीं ! माझ्या इच्छेच्या, मनाच्या, निश्चयाच्या आड येणाराला धुळीला मिळ- वितांना जाणूनबुजून मी गैर शुद्धीवर राहतों ! मीः – छान् ! माणूसकीचा गळा दाबणाऱ्या सैताना-चांगली तुझी तयारी असते-आहे म्हणावयाची ? आजवर असें काय आणि किती अमानुष अत्याचार केले असशील ? मॅनेजर:-

- पुष्कळ ! पुष्कळ आजपर्यंत केले आहेत ! आतां सांगत

'तुला वाटेल तर नव्या गोष्टी ! केवळ तुझ्यापायींच काय केले आहे तें ? तुझ्याचपायीं तुझ्या संतूला आजची वेळ प्रात्प झाली आहे ! त्या स्थितीत मलाच त्याला घालावें लागले आहे ! तुझ्याबद्दलची माझी मागणी त्यानें फेटाळून लावली नसती - माझ्या इच्छेच्याविरुद्ध मजुरांचा पुढारी झाला