पान:मजूर.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ मजूर मॅनेजर: – जबरदस्तीने घेऊन जाईन ! माझ्या निश्चयाकरितां जबर- दस्ती करावी लागेल ! मी:-आरडून ओरडून मला गोंधळ करितां येणार नाहीं काय ? - लोक सोडविणार नाहींत काय ? मॅनेजरः – हंः लोकांना सांगेन हिला वेड लागले आहे. वेडाच्या भरांत ही असेंच करते ! सुगंधा, मी एकदां ठरविल्यावर, माझ्या विरुद्ध कोणींच येऊं नये. माझ्या इच्छेप्रमाणेच प्रत्येकानें वागले पाहिजे. नाहीं तर सुगंधा, तुला माहीत नाहीं, मी तसा फार विचित्र माणूस आहे. परिणाम फार भयंकर करीत असतों ! Mind well! That much I tell you ! मी:-पशू ! तुम्हांला देवाची- निदान इथल्या कायद्याच्या कचाटीची तरी थोडी भीति आहे काय ? मॅनजर:- मुळींच नाहीं ! भीतीचे कारण काय ? देव आणि कायदा मला काय करणार ? जे देवाला भिऊन जन्मभर वागले, आणि काय- द्याची ज्यांनीं पर्वा बाळगिला, त्यांचें तरी काय होतें ? देवाला भिणारा सज्जन – आमचा इच्छागमभाई, तुझ्या मैत्रिणीचा बाप - कां त्याचा शेवट कसा झाला ? कायद्याच्या कट्यारीच्या धारेवर कसरत करणारा तुझा प्रतिष्ठा मारणारा संतू, आज कुठल्या स्थितीत आहे ?- अग भित्या पाठींच ब्रह्मराक्षस लागायचा ! मला कशाचीच भीति वाटत नाहीं ! मला कोण काय करणार ? हं, रिकामा काथ्याकूट नको ! माझ्या निश्चयाच्या आड येऊं नकोस ! निघायच्या तयारीला लाग कशी ! खुषीनें नाहीं आलीस, तर सक्तीनें उचलून नेणार म्हणून मघाशींच सांगितलें आहे ! पण म्हणतों, तुझी शोभा, आणि मला तेवढे कष्ट कां ? आतां या संकटाला काय करायचें ? कसें सुटायचें यांतून १ दुर्दैव आम्हांला आणखी किती छळणार आहे ? पळून जाईन म्हटलें - दार लावून टाकलेलं - तिथेच. दाराजवळ बसलेला ! कसें सांगून याला बाहेर घालवूं ? दुःखा--त्रासानें हृदय जळते आहे- आज दादाच्या केसच निकाल होऊन त्याची भयंकर शिक्षा डोळ्यापुढें थयथया नाचून अंगाची लाही करते आहे — आणि त्या उण्याला म्हणून हें वर !