पान:मजूर.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १८ वें तुझा वाग्दत्तवर (?) झांझिबारांत आहे तोपर्यंत काम करणार ? कदाचित् तो तिकडच्या तिकडे खपलाच असला तर ? आणि कर्धीकाळी-तूं एका खुनी भावाची बहिण आहेस असे कळल्यावर, तो आपल्या लहानपणच्या वचनाला जागेलच असे कशा वरून ?- असा कांहीं दूरवर विचार कर शील की नाहीं ? अशा स्थितीत मी होऊन तुझ्याकडे, तुझ्या जाग्याची सोय लावायला - तुझ्या संबंधाची माझी सहानुभूति - " मॅनेजरचा कांळेपणा अधिकाधिक बाहेर यायला लागला ! " तुमची सहानुभूति मला अंथरायची नाहीं कीं पांघरायची नाहीं ! कां उगीच मला सतावतां ! " त्रासातिरेकानें मला अधिक बोलवेना ! ८८ ' हे पहा, मी अजून तुला सौजन्याने सांगतो आहे. आणि माझ्या बाबतींत दुसरें असें एक आहे, मी एकदां एक कांहीं अमूक-असे असें हें करायचे असें ठरलें, एकदां निश्चय केला; की मग केलाच. तें करा- यचेच ! मग कांहीं होवो ! दुसऱ्याकडे मी लक्ष देत नाहीं. दुसऱ्याचें ऐकत नाहीं ! कोणी आड आले, तर त्याला कापून काढायला मागेपुढे पहात नाहीं. आतां हेच; तुला एकदां घेऊन जायचें, आणि तुझ्याशी लग्न करायचे ठरविलें आहे ना ? झालें, वज्रलेप झाले आहे हे ! तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार ! तुझ्याशी लग्न करणार म्हणजे करणार ! तें सगळे कांहीं मी माझ्या मनासारखें करणारच पहा ! हं, आतां त्यांतून तूं म्हण- शीस कीं, " मी लग्न करणार नाही, तशीच तुमच्याजवळ राहीन !" तर अशावेळी तशी सवलत देईन फार तर ! समजलील ! पण माझा निश्चय म्हणजे मग निश्वयच तो ! त्याच्या आड कोणी येऊ नये भल्यानें! मी:- तुम्हीं मनुष्यच आहांत का ? कां राक्षस आहांत ? मॅनेजर:- तुझ्या सोयीला, व आवडीला वाटेल तसे तूं समज ! मी- मला तूं, काय समजावेंस हें तुझ्याच आवडीनिवडीवर ठेवतों-मग तर झालें ? मी:- चालते व्हा इथून - मी साफ येणार नाहीं ! मॅनेजर: -तुला घेतल्याशिवाय मी इथून मुळींच हलणार नाहीं ! मी:- मी नाहीं आलें तर ? काय कराल ?