पान:मजूर.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.१८० मजूर " मी कुठें इथून हलणार नाहीं ! मला कुठे जायचें नाहीं ? जीव मूठीत धरून मी म्हटलें ! 1 “ म्हणजे ? कां ?” मॅनेजर गडबडीनें म्हणाला. "मूर्ख आहेस का वेडी आहे ! इथें राहून करणार काय तूं : उद्यां तुझ्याजवळ खायला नसेल ? उद्या महिना झाला की घरभाड्याचें काय करशील ? घरवाला हाकून देईल तेव्हां ! म्हणून नीट माझ्या कडे नेतों आहें ! - एकाद्यावर उपकार करायला जावें तर - " " तुमचे मला कोणाचे उपकार घ्यावयाचे नाहीत ! दाखविली इतकी कळकळ पुष्कळ झाली ! आभारी आहे मी त्यावद्दल ! आपण आलांत तसे परत जा — " मी सांगितलें- 66 वा ! तें कसें शक्य आहे ? तुला घेतल्याखेरीज मी कसा जाणार? शिवाय, आणखी तुझ्या संबंधांत मी काय ठरविलें आहे, त्याची तुला काय कल्पना आहे ? मी काय तुला माझ्याकडे चार दोन महिने ठेवून मग सोडून देणार आहे, असे समजतेस की काय तूं ! छट् ! मी तुला जन्मभर सोडणार नाहीं ! तुझ्याशी लग्न करायचे ठरविलें आहे ! रत्नू आपल्याजवळच राहील ! आणखी दोन तीन वर्षे तो पडेल आपल्या अंगावर ! मग चिकटवींतच आहे गिरणांत त्याचें पोट बाहेर निघालें म्हणजे झालें ! असा मी बेत केला आहे ! संतु जरी आज फांसावर लटकला - " 66 गप्प बसा ! एक अक्षर बालू नका !-आल्या वाटेनें चालते व्हा पाहूं ! " मॅनेजरचे स्वैर प्रलाप ऐकून माझें मस्तक भणाणले ! मी एक- दम त्याला चालतें व्हायला सांगितलें. " माझ्याबदल कोणी सहानुभूती दाखवायला नको कीं, माझ्यावर कोणी उपकार करायला नको ! " “ राहिलं ! उपकाराची भाषा सोडून दिली ! माझ्याकडे यायचें कबूल करून तूंच माझ्यावर उपकार कर, असें वाटेल तर म्हणतों. मग तर झालें ! " मॅनेजर अधिकच पानचटपणा करूं लागला ! " सुगंधा, असें तसे कांहीं करूं नकोस ! माझ्या इच्छेच्या विरुद्ध जाऊं नकोस ! मी म्हणतों त्या प्रमाणें नीट ऐक ! मला माहित आहे, क