पान:मजूर.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १८ वें

१७९

"तुझा गैरसमज झाला सुगंधा ! मी संतूला संकटमुक्त कसा करणार? त्याचें जें कांहीं व्हावयाचें तें होणारच ! पण त्याच्यावरील संकटाची झळ तुला लगूं नये - तुझ हाल होऊं नयेत. याच्या व्यवस्थेसाठीं मी आलों आहे ! हें तुला सांगत होतों. I must take care for you and your younger brother !Its my duty I suppose!"
 मी घोटाळ्यांत पडलें ! माझी निराशा झाली ! मी खाली मान घालून जागच्याजागी उभी राहिलें.
 "सुगंधा, माझें म्हणणें, आणि मी तुझ्याकरितां काय करणार आहें, हें तुझ्या अजून लक्षातच आले नाहीं ! तें मी तुला आतां सांगणार आहे ! तुला आणि तुझ्या या भावाला, इथून नेऊन आमच्याकडे- आमच्या घरी खुशाल मजेत आणि सुखांत ठेवण्याचा माझा निश्चय झाला आहे ! आज तुम्हांला घेऊन आईन. आणि उद्यां परवाकडे, नाहीं तर महिनाअखेर इथलें तुमचें सगळे चंबुगबाळें सावकाश घेऊन जाऊं.. त्याचें कांहीं आजच अडत नाहीं ! " मॅनेजरनें अंतस्थ हेतु व्यक्त केला... मी त्याच्याकडे पहातच राहिले ?
 " अशी आश्चयाने माझ्याकडे पाहू नकोस !” मैनेजर पुढे बोलूं लागला, I must do this! I must help you! माझ्या घरीं जाऊन पडल्यावर तुला कशाचीच काळजी नाहीं ! तेव्हां म्हणतों, लवकर आर. गाडी अ णायला सांगतांच, आणतों आणि निघू. तुझें खायचं झालेच आहे वाटतें, आतां तें खाऊन घ्या ! अगोदर आलों असतों तर तुला मुळीं करूंच दिलें नसतें ! आपल्या घरी गेल्यावरच केलें असतें ! आतां असूं दे ! — केलेलें खा आणि चला ! "
 यावर काय बोलूं ! आंतल्या आंत गुदमरल्यासारखें झालें ! इतकी याची लगट कां ? इतका लाघावीपणा कशासाठी ? दादाला खुनी म्हणून पकडून नेला म्हणून भाईजवळ काय दादाला शिव्या देण्यास हा तिकडे होताच आणि आज हैं याचें काय वर्तन ?
 " आटोपतेस ना लवकर ? मग उशीर कां ? झालें आहे ना सगळें ? ए, मुला, चल ऊठ जेवायला बैस !”