पान:मजूर.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८
मजूर

साठीं, कुणासाठीं, आणि काय उद्येशाने आला-माझी कांहीं कल्पना चालेना! मी त्याच्याशों बोललें नाहीं कीं, पुन्हां त्याच्याकडे पाहिलें नाहीं ! बसा म्हणून सांगितलें नाहीं, कां आलांत म्हणून विचारलें नाहीं !' त्यालाही माझ्या विचारण्याची जरूरी दिसली नाहीं. त्यानें आंत येतांच दार लोटलें, वर बोलटही लावला, आणि त्या खिडकीत चढून बसला !
 " सुगंधा ! " थोडा वेळ मी बोलतें कीं नाहीं, याची वाट पाहून त्यानेंच सुरवात केली ! मी त्याच्याकडे पाहिलें. कांहीं बोललें नाहीं !
 "सुगंधा ! मी तुझ्या समाचाराला आलों आहें ! काय तुझी ही स्थिति झाली आहे दोन दिवसांत १ डोळ्यांत प्राण येऊन बसला हा गुटगुटीत गुलाम कसा जरत्कारु झाला पहा! खरोखर I pity for you!” तरीही मी कांहींच बोललें नाहीं. मला त्यांच्या येण्यानें, आणि बोलण्याने कसेसेच वाटायला लागलं. मनांत वेड्यावाकड्याच कल्पना यायला लागल्या.
 " बोलत नाहींस सुगंधा तूं ! मी तुझ्या समाचाराला आलो. तुझी आई गेली म्हणून कळले. त्यांत संपूने हा भयंकरच प्रसंग ओढवून घेतला! कोणती गोष्ट करतांना मागचापुढचा विचार केला नाहीं, म्हणजे असेंच व्हायचें. आपण हें करतों, पण पुढे काय होईल, आप दोन भावंडे आहेत, त्यांनी काय करावें ? याचा कोणचा कांहीं विचार तरी घेतला का ? - आज त्याला जन्म नेपची शिक्षा झाली म्हणजे - आणि ती होणारच - पुढें तुमचें कसें होणार ? "<br.  माझ्या मनांत जे विचार चालले होते, ते शब्द फोनोच्या प्लेटसारखे खुशालचंदाच्या तोंडांतून बाहेर येऊ लागले ! माझ्या डोळ्यांतून आपो- आपच पाणी येऊ लागलें !
 "नको! सुगंधा, रडूं नकोस! मी तुला रडविण्याकरितां आलों नाहीं ! तुला हंसविण्याकरितां तुझ्यावरची परिरिस्थिति दूर करण्याकरितां संतु- वरील संकटाची - "
 "काय ? दादावरचें संकट दूर करण्याची खटपट करता आहांत ?-- मी पट्कन जाग्यावरून त्याला विचारलें !