पान:मजूर.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १८ वें

१७७

विचार घोंटाळत राहिले होते ! पुढचें दार मुंबईच्या रिवाजाप्रमाणें लोटून ठेविलें होतें. दत्तासाहेब बाहेर गांवाहून अजूनही आलेच नव्हते. त्यांना आमची स्थिती कळली असेल का ? वर्तमानपत्रावरून कळलीही असेल ! अजून कसें कळल्याखेरीज राहील ? आमच्याबद्दल त्यांना काय वाईट वाटत असेल ? दादा वाहवला, निष्कारण त्यानें आपल्यावर 'मजुरांच्या' भानगडीत पडून प्रसंग ओढवून घेतला, असें ते समजून, त्यांच्या मनां- तून तो उतरला असेल. आतां आम्हांला ते येथे राहू देतील का ? पण आम्हांला राहून तरी काय करायचे ? मग जायचे कुठे ? करायचे काय ? बबूताई सोडणार नाहीं, पण तिच्याकडे काय म्हणून राह्यचें ? तिच्यावर दोघांचा भार काय म्हणून घालावयाचा ? मग काय करावयाचें ?" एका माणून एक, हे विचार यायला लागले होते. हे विचार आले कीं थांबले ! अमुक करूं, तमुक करूं, असे दिवस काढू, तसा चरितार्थ चालवू ? असा विचार डोक्याला करतां येत नव्हता ! पुढें अफाट जग पसरलेलें, पण पण त्याचा काय उपयोग होता ? हेंच अवाढव्य जग 'दादा'चा - निर-पराध दादाचा - अहारेरात्र पोटासाठीं जगाला भिऊन, वागून हाडांची कार्डे करणाऱ्या दादाचा बळी घ्यावयाला तयार झालें होतें ! तें हें जग मला कसें जगविणार ? माझी काय कींव करणार ? भविष्याबद्दल मला सर्व अंधारच दिसला होता. एक पाऊल पुढे टाकायला जागा दिसत नव्हती ! मी सर्व बाजूंनी हताश झालें होतें !" आतां आमचें पुढें कसें ? याला कांहीं उत्तर नव्हतें ! -
 दहा बाजून गेले असतील. भात झाला. खाली उतरून ठेवला. पिठलं करायच्या तयारीला लागलें. इतक्यांत लोटलेलें दार कुणी उघ- `डल्याचा आवाज झाला. मी वळून पाहिलें, तो दार उघडून खुशालचंद मॅनेजर आंत आला !
 मी त्याला पाहून दचकलें ! अंगावर कांटा उभा राहिला! त्याला आलेला पाहतांच रत्नु वळकटीवरून झटकन् माझ्या बाजूला येऊन 'बसला ! रत्नूची बावरलेल्या सशासारखी स्थिति झाली ! हा यावेळीं इथें कां आलाय ? ' दादाला पकडल्याचें जाहिर झाले आहे.' मग इथे कशा-
 म...१२