पान:मजूर.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६
मजूर

नांव असलेलें, अलें होतें. सर्वांच्यामतें पापाला वाचा फोडणारी ती एक खास किल्ली होती. असो.
 दादाच्या कच्च्या चौकशीच्या सुरवातीला आपण सगळेजण कोर्टात बरोबर जायचें, असें बबूताईंजवळ ठरून रत्नुला घेऊन घबूताईच्या बंगल्यावरून दुसरें दिवशीं सकाळींच मी माझ्या बिन्हाड आलें होतें. त्या दिवशीं जी गेलें, ती तिकडेच आतांपर्यंत होतें. बबुताई नको म्हणत होती, तरी यायला पाहिजे होतें. बिन्हाड सोडून बाहेर किती दिवस राहावयाचें तर ? - अकरा वाजल्यानंतर पुन्हां बबूताई माझ्याकडे येणार होती. दादावरची केस दुपारी कोर्टात सुना वणीला निघावयाची होती. ताई कोर्टात येणार होती. कोर्टात जायला बबूताई व भाई येईपर्यंत, मला, आणि रत्नूला जेवण आटपून तयार व्हावयाला पाहिजे होतें. तें कदाचित् माझ्या हातून वेळेवर होणार नाहीं, बिन्हाडांत गेल्यावर, आईची आठवण, दादावरील संकटें- आणि आपली भावी परिस्थिती, या सर्वोच्याच विचाराने मनाला आवरतां येणार नाहीं ! आपली जागा तर खायला अंगावर येईल असें बबूताईप्रमाणें मा वाटत होतेच. पण काय करणार ? आलें हें पाहिजेच होतें !
 घरीं आलें. झाडलोट केली ! नळाचें पाणी जायच्या आत भरून घेतलें जरूरी पुरतें. पाणी तापवून रत्नूला स्नान घातलें. मी अंग धुतलें ! शेगडी पेटविली. आणि तांदूळ धुवून टाकले. आईच्या सुतकांतच अजून आम्हीं होतों. तिच्या ठिकाणचा लावून ठेवलेला दिवा विझला होता ! - मध्यं- तरी कुणी नव्हतेच मग लावायचा कुणी ? दिवा विझलाच होता. तो दिवा पुन्हा लावला. भाताला कढ आला होता-स्ट्रट्रट् वाजत होतें, वर ठेविलेल्या झांकणाला वर उडवीत वाफ बाहेर पडतांना 'सुंईss' करीत होती - त्याकडे अर्थशून्य दृष्टीनें मी पहात बसलें होतें ! रत्तू दादाच्या वळकटीवर पालथा पडून उगाच कुणीकडे तरी टक लावून पहात होता- मी उदास होतें. रत्नुवर माझ्या उदासीनतेची छाया स्वाभा विकच पसरली होती ! तोंडांत देवाचें नांव येत नव्हतें कीं कांहीं दुसरें आठवत नव्हतें !
 "दादाला भयंकर शिक्षा होणार ! " याच कल्पनेभोवती मन आणि