पान:मजूर.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १८ वें

१७५

करीत, तर एकाद्याचें पान तोडण्याचा उपद्व्याप करीत नाहींतर फुलपांखरें उडत त्यांना धरण्याचा प्रयत्न करीत - त्या मंडळाच्या भोवतीच गुंडाळत होता. याच त्याच्या उद्योगांत त्याला जवळच चकचकीत काय सेसे दिसलें. त्यानें तें चटकन् उचलले; आणि आनंदून उड्या मारीत भाईजवळ येऊन त्यांच्यापुढे करीत "ही पहा मला गंमत सांपडली! कशी चकचकीत आहे!” म्हटलें भाई' रत्तूनें दिलें तें बोलण्याच्या नादांत होता. त्यानें तसेंच रत्नुनें हिरमुसलें हाऊ नये या करितां घेतलें. इन्स्पेक्टरांची त्या जिन्नसाकडे तात्काळ नजर गेली. व त्यांनीं पाहूं' म्हणत आपल्या हातीं ती जिन्नस घेतली ! निरखून पाहिली. आणि लगेच आनंदाच्या चढत्या स्वरांत बॅरिस्टरांच्या खांद्यावर हात ठेवीत म्हटलें, 'बॅरिस्टर- साहब, ही पहा एक गम्मत ! - खऱ्या खुनी माणसाची संबंधि ही वस्तु तुमच्या लहान मुलाच्या हातानें 'चिट्टी उचलून' घेतल्याप्रमाणें हातीं आली ! आपण उभे आहोंत हैं ठिकाण, ही जिन्नस, झाली परिस्थिति-हें उंबराचें झाड, त्यावरून त्या खिडकीच्या गॅलरींत सहज चलाखीनें जाण्या येण्याचीं सोय पहा -"
 ' ठीक ! ठीक ' बॅरिस्टर उद्गारले. हा दुवा चांगलाच जमला. दादा- लाही ती जिन्नस पाहून आश्चर्य वाटलें ! " भाईसाहेब, शेटजींच्या दुःखांत चूर असल्यानें तुमच्या बंगल्याच्या झाटलोटीकडे दुर्लक्ष झालें, त्याचा चांगलाच उपयोग संतुराम सुटायला व खरा खुनी मिळायला झाला ! आतां तुम्हांला सांगतों:-
"खुनी सांपडला ! बॅरिस्टरसाहेब, आपण यावेळीं येथें आलों फार चांगले झाले नाही? चला, आतां तुमच्या हातीं खुनी ११२ दिवसांत कसा देतों, हें तुम्हांला वाटेंत सांगतों. " इतके सांगून, व भाईचा निरोप घेऊन, व परत कोर्टात आपण सगळे बरोबरच इथून जाऊं म्हणून सांगून दोघे चालते झाले !
 आशा वेडी असते. मी - बबूताईनें जरी अगदीं घरि सोडला होता, तरी भाईनीं दादाकरितां आटोकाट प्रयत्न चालविले होतेच. आज जी रत्नुला जिन्नस सांपडली, तें एक सोन्याचें शर्टचें बटण मालकाचें त्यांवर