पान:मजूर.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १८ वें
पापाला वाचा फुटली

 "भाई -प्रेमचंदभाई, आहेत काय ? – "
 "कोण ? बॉरिस्टर साहेब - या. "भाई बंगल्याच्या बाजूच्या बागेमध्यें येरझारा घालीत होते. रत्नु त्यांच्या पाठीमागें उगीचच फिरत होता. भाईची फेरी संपून परत वळावयाला, आणि बॉरिस्टर, व त्यांच्या बरोबर सी. आय.डी इन्स्पेक्टर फाटकांत शिरून त्यांनी भाईंना हांक मारायला एकच गांठ पडली. जवळ येतांच बॅरिस्टरांनीं बोलायला सुरवात केली:-
 " भाई, मी व इन्स्पेक्टरसाहेब आतांच संतुरामाची गांठ घेऊन आलों. आम्हांला जें विचारावयाचें होतें, तँ विचारलें. त्यावरून तुमचा संतुराम निर्दोषी करावयाला आतां अतीशय सुगम झाले आहे. खरा खुनी-- आपली, संतुरामाची, आपल्या व संतुरामाच्या सिस्टर्सची सर्व हककित ऐकून घेतल्यावरून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कीं वहिमी ११२ दिवसांत पक- डल्याखेरीज राहात नाहीं. इन्स्पेक्टरसाहेबांनी संशयी माणसाभोंवतीं आपले जाळेही व्यवस्थित विणलें आहे. तुमच्या सांगण्यावरून संतुराम मी विचारीन त्याला उत्तरें देईल कीं नाहीं याची मलाही शंका होती पण तसें कांहीं झालें नाहीं, ! "
 " ठीक झालें ! " भाई आपल्या प्रयत्नाला यश येणार या भावनेनें साहजीकच उत्तेजक स्वरांत उगारला ! "आणखीही कांही आम्हां सर्वोला विचारावयाचें असेल, तर खुशाल विचारा !”
 ही मंडळी आतां साहजीकच जेथें उभी राहिली होती, ती जागा- बंगल्याच्या माडीवर जाणाऱ्या जिन्याच्या बाजूला होती. उंबराचें बरेंच मोठें झाड तेथें होतें. दुसऱ्या मजल्याची जिन्याजवळची खिडकी अगदीं डोक्यावरच आलेली होती. भाई, बॅरिस्टर, व इन्स्पेक्टर आणखी 'केस' च्या बाबतींत तेथेंच बोलत उभे राहिले. रत्नुही एकदां वर सर्वाच्या तोंडा कडे पहात, एकदां जवळच्या फूलझाडावरील फूल काढण्याची खटपट