पान:मजूर.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ व

१७३

 "जा ! ताई, बबूताई, जा आतां ! किती बसलों-वोललो तरी अखेर ठरली आहे ! जातांना एवढेच सांगतों तुला ! आजवर अधिकउणें बोललो असेन-लहान तोंडी मोठा घांस घेतला असेन तर तें सगळें विसरून जा ! तुमचा आमचा या जन्मींचा ऋणानुबंध सरला, त्याला- कुणाचाच इलाज नाहीं ! आतां गांठी भेटी - स्नेह संबंध पुढल्या जन्मीं ! ईश्वराजवळ असे माणूं या कीं, या जन्मांतल्या या जन्मांतच काय हाल- अपेष्टा, यातना, क्लेश, दुःख, द्यायचें तें देऊन घे ! पुढल्या जन्मीं आमच्या, तुमच्या स्नेहांत आनंदांत, मैत्रींत, सुखांत असा हात घालू नकोस ! भाईला विचारीत होतों म्हणून सांग ! आतां ताई, आणि रत्नु तुझाच आहे !! जा आतां " दादाला जास्त बोलवेना त्यानें तोंड फिरविलें. दादाला जितकावेळ अधिकान्यांनी दिला होता तो खलास होतांच तुरंगाच्या त्या निर्विकार माणसांनीं रत्नुला दादापासून स्वस्कन् ओढून आमच्याकडे लोटला, व दादाला 'चल ' म्हणून सांगून चालावयलाच लावलें. आम्ही जड पावलांनीं, दुःख भारानें, डोळ्यांतून अश्रूंच्या नद्या वाहवत परतलों ! मागे वळून पाहण्याच्या आतच दादा आमच्या दृष्टीआड झाला होता ! भविष्यकालाच्या पडद्यावर आमच्या- करितां आणखी कांहीं वाढून ठेविलें आहे काय ? हें डोळे ताणून आम्हीं पहात होतों ! हेतुशून्य, भावनानष्ट मन ' उद्यांकडे पाहावयाला, व कोसळणारी नवी आपत्ति सहन करावयाला तयार करीत आम्ही दोघीही चाललों होतों. तुरुंगाच्या बाहेर येईपर्यंत रत्नु त्या राक्षसावतारांच्या दह- शतीनें गप्प होता, पण बाहेर आल्यावर रडायला लागला. दाबलेल्या रड- ण्याचे हुंदके रत्तूला एकसारखे यायला लागले !