पान:मजूर.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
मजूर

खुनी इथल्या जगांतल्या माणसांच्या न्यायमंदिरांत सुटला, तरी ईश्वरी न्यायासनापुढे खास तो निर्दोषी ठरत नाहीं ! आणि आज आम्हीं जरी जगाच्या कोर्टात अन्यायी ठरलों, तरी ईश्वराचें वरिष्ठ न्यायासन खात्रीनें आम्हांला दोषी ठरविणार नाहीं ! मग कोणाला कां भ्या ? सत्याच्या स्वयंप्रकाशाला कशाची भीति आहे ? ”
"दादा, दादा, हें तुला कुणी इतकें बोलायला शिकविलें तरी १ " बुताई गहिंवरून म्हणाली !
 " दारिद्यानें ! दारिद्र्यांतल्या निष्ठुर न्याय नीतीनें - आणि समाधानानें " दादा म्हणाला. झालें ! तुरंगाचे लोक गडबड करायला लागले. चला बाहेर म्हणून सांगायला लागले. आमचा पाय तेथून हलेना ! रत्नुनें पुष्कळ उशीरानें- दादा बोलावयाला लागल्यावर ओळखलें होतें ! नंतर तो दादाला जाऊन बिलगला. तो त्याला सोडीना. " याला कशाला आणलेंस ? " दादा म्हणाला. "पण, असू दे, आतांपासून याची माहिती असूं दे. माझ्यापेक्षां त्याला किर्ती तरी मोठी चांगली कार्ये करा- वयाची आहेत. तेव्हां त्याला किती वेळ या ठिकाणी यावें लागेल कुणास माहिती ? तेव्हां तें झालें तें बरेंच झालें ! " म्हणून रत्नुचा मुका घेतला; आम्हीं जायला उठला."
"दादा, तूं चल ! तूं का इथें बसला आहेस ? " रत्नु जास्तच दादाला चिकटू लागला.
 "दादा, मी नाहीं तुला तोडणार ! तू आल्याखेरीज मी जेवणार नाहीं ! चल ना ? - ताई दादाला बरोबर घेऊं या घरांत आई नाहीं, दादा येत नाहीं. आम्हांला कसें करमणार ?- दादा मी रडणार नाहीं ! आई कुठे गेली म्हणून विचारणार नाहीं, खायचा हट्ट धरून बसणार नाहीं ! चल ना दादा !" मी, बबूताई, दोन्हीं हाताला धरून खेचू लागलो. दादा सोडवून घ्यावयाला लागला पण रत्तू ऐकेना ! आम्हीं एकीकडे रडत होतों, आणि रत्नुला दादा जवळून ओढून घेत होतों. -रत्न मोडींना. रडायला लागला, आतां दादानें आवरलेलें डोळ्यांतले पाणी, त्याला न जुमानतां त्याच्या गालांवरून ओघळू लागलें ! मायामोह मोठा कठीण आहे !