पान:मजूर.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वे

१७१

 " आमच्या सारख्या दरिद्री, हतभागी प्राण्यांबद्दल ईश्वरानें बबूताई सारख्यांच्या मनांत, प्रेरणा करून, त्यांना कष्ट कां द्यावेत, हेंच कळत नाहीं ! ताई, आतां माझें कांहीं होवो, मी मरणाला तयारच आहें ! आतां तुझें आणि रत्नुचें कसें होईल, याची पण मला धास्ती राहिली नाहीं ! जगानें कांहीं म्हटलें, आणि सरकारी चौकशी कसलीही होऊन मी फासावर लटकलों, तरी तुझें आणि रत्नुचें रक्षण कुठल्याही परिस्थितींत बबूताई करीलच !-बबूताई, माझ्या, नव्हे, तुझ्या भावडांना अंतर देऊं नकोस, हेंच तुझ्याजवळ या पामराचे अखेरचे मागणें आहे ! शेटजींनी मला आपले मूल म्हणविलें होतें – तूं तर या दोघांना बहिण भाऊ अगोदर पासून समजतेंसच आहेस. तेव्हां तुला अधिक काय सांगावयाचें आहे ? " दादा म्हणाला.
 "दादा, असें निर्वाणीचेंच काय बोलायला लागलास ? " मला घड बोलवेनाही.
 "ताई, वेडी तर नाहींस तूं ? हैं यावेळींही बोलायचें नाहीं तर केव्हां ? हीच आतां तुमची आमची शेवटची मुलाखत ! आपली आई पुढे गेली शेटजी चालते झाले— त्यांची स्वर्गात सोय लागली आहे की नाही, हें पाहण्याकरितां जायला मी उद्यां निघणार आणि आतां बोलूं नको तर केव्हां ? मला या जगांत राह्यचें कारणही उरलें नाहीं. माझ्यासारखा फाटका माणूस केलें यापेक्षां जास्त काय करणार ? मजुरांचा प्रश्न सोड- विला ! त्यांना कांहीं काळ सुखी केलें. शेटजींनींच सांगितलें ! शेटजी मजुरांचे कैवारी होते - मी थोडे फार शरीर कष्ट केले- दोघांनीं गरी- बांना दोन चांगले दिवस दाखविले. आतां इथें राह्यचें तरी कशाला ? " दादा निर्भयपणाने बोलत होता !
 "खरा खुनी सांपडला असता तर? -कां बरें दादांच्यावर आग चांडा- ळांनीं पाखडली ? " बबूताई म्हणाली ! – तिला आणखी रडूं यायला लागलें.
 " जाऊं दे बबूताई ! काळ कांहीं इतका खास खुळा नाहीं, कीं शेट• जींचा खून करणाराला अगदीं अमरपट्टा देईल ! शेटजींच्याप्रमाणें किंवा माझ्याप्रमाणें त्याला आज उद्यां पाळी ही द्यावी लागणारच ! ताई, खरा