पान:मजूर.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
मजूर

जा म्हटलें निघालें पाहिजे ! ईश्वराच्या आज्ञेला कुरकुर करून काय उप- योग ? " दादा तात्विक विचार बोलत होता.
 "संतुदादा किती कठोर बोलतां आहांत- इतकें कसें बोलवतें तुम्हांला ?-- असें बोलायला आपल्याला कुणी शिकविलें ?-- संतुदादा " बबूताईच्यानें आतां राहवेना.
 " बबूताई, इतकें कठोर बोलायला मला माझ्या कठोर परिस्थितीनेंच शिकवलें, बोलायला लावलें, आणि व्हावयाला लावलें, बबूताई, मजुराच्या वांट्याला मार्दव कुठून येणार? पण बबूताई आपणही इकडे यायची तसदी कशाला घेतलीत ? आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे-- त्यांतून--'.
 " नका ! संतूदादा, असें बोलूं नका ! मी तुम्हांला बोलूं द्यायची नाहीं ! दादा, माझ्यावर दुःखाचा डोंगर आज कोसळला आहे--पण उद्यां आकाश कोसळणार आहे त्याची काय वाट ?- दादा, बाबांचा खून करणारा खरा खुनी – ” बबूताईनें विचारलें.
 " मी आहें, अशी ताई तुझी आणि भाईची समजूत -- खात्री झाली आहे का ? " दादानें मध्येच तिचारलें-
 " शिव ! शिव! असें दादा आम्हांला स्वप्नंस्वप्नांतरीं कसें वाटेल ?- पण कुणी चांडाळानें हें पापी कृत्य करून तुझ्यावर आणलें - " बबूताईंच्या डोळ्यांतून पाणी गळायला लागलें.
 “अस्तु! ताई, बबूताई, आतां एकदां नाहीं, तर दहादां आनंदानें फासा- वर लटकण्याची माझी तयारी आहे ! आतां मी कळीकाळाच्या दबकावणीला भीत नाहीं ! बबूताई, याच एका आत्मविश्वासावर बेधडकपणानें बसलों आहें. मला या स्थितीचें कांहीं वाटत नाहीं. पण हेंच जर का माझ्याबदलचा तुम्हां भावंडाच्या मनांत किंतू आला असतां - तर माझ्यासारखा हत- भागी त्रैलोक्यांत मीच असे मला वाटलें असतें ! आणि मरणाहून मरण वाटून प्राणांतिक वेदना झाल्या असत्या ! " दादा म्हणाला. दादा, तुझ्याकरितां भाईने बॅरिस्टर बी. सदाशिवाला दिले आहे ! आज तुला भेटायला यावयाची आमची सर्व व्ववस्था भाईनें आणि बबू- ताईनेंच करविली ! मी सांगितलें.