पान:मजूर.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वे

१६९

 "दादा! हृदय दाटून येऊन मी हांक मारली.काय बरें हें झालें ? "
 " ताई, ही एक तपश्चर्येची पायरी आहे ! --तपश्चर्येच्या या पायरीवर आहें मी यावेळीं ! तूं कां वाईट वाटून घेतेस ?--कां रडतेस !" दादा - संथपणाने बोलला !
 " दादा - रडूं नको तर काय करूं रे? --दादा, हें काय तुझ्या नशिबीं आलें?" काय बोलूं, काय विचारूं दादाला मी ?
 "ताई, 'देशभक्तां प्रासाद बंदिशाला !' माझें हें भूषण आहे ! माझ्या प्रमाणिक प्रयत्नांचें हें पारितोषक आहे ! " दादाच्या स्वरांत चलबिचल मुळींच नव्हती !

 "काय बोलतोस दादा हें ? तुझ्या आयुष्याची अखेर ही अशी व्हायची १.."
 " होय - केव्हां तरी आणि कशी तरी व्हायचीच कीं नाहीं ? ती अशी होत आहे ! आल्या प्रसंगाला शूरासारखें सामोरे जायला नको काय ?" दादा उद्गारला.

 या प्रसंगाच्या वेदना सोसवताहेत तरी कशा दादा तुला ?" " कां बरें ? मी शांतपणानें सोसतों आहें !
 " पण तुझ्या हातून कांहीं झालें नसून -
 'म्हणूनच हा प्रसंग शांतपणानें सोसतों आहें - माझ्या हातून कांहीं अत्याचार झाला असतां, तर अशा वेळीं, इतक्या शांतपणानें तुझ्याशीं बोललो तरी असतो का मी? माझी नाडी नेहमीप्रमाणेंच कशी ठोके देत राहिली असती ? – ज्याला कर नाहीं, त्याला डर कशाची आणि कां ?" पण संन्याशी सुळी जात नाहीं का या प्रकाराने १"
 " जाईल ! संन्याशाला काय त्याचें ? आणि त्याला कांहीं वाटलें तर तो मग संन्याशी तरी कसला ?
 " असें कसें तुला बोलवतयं ? इतका थंड शांत कसा तूं ? -आज इथें आहेस उद्यांची तुझी अवस्था - "
 " आज या जगांत उद्यां दुसऱ्या जगांत ? आपले काय जातें १ ईश्वराच्या हुकुमाचे ताबेदार आहोंत आपण - रहा म्हटलें राह्यलें पाहिजे