पान:मजूर.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८
मजूर

करीत ? बाबा गेले ! -पण आतां त्यांच्यासाठीच संतुदादावर गदा कशासाठी ही ? मी सांगतें, दादा निष्कलंक सुटणार ! बाबांचा खून दादाच्या हातून कधींच व्हायचा नाहीं-झालेला नाहीं !" " पण काय- द्याची कचाटी, तर दादालाच खुनी ठरविणार ठरविणार कसली- ठरविलें !" मी हताश होऊन म्हटलें !!
 लवकरच आम्हीं तुरुंगाच्या दरवाज्यांत येऊन ठेपलों. दारावरच्या रखवालदाराकडून तुरुंगाच्या मुख्याधिकाऱ्याकडे आमची वर्दी पोंचविली. परवानगी मिळालीच होती. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने आमचा अंत घेतला नाहीं. आमच्याबरोबर दोन शिपाई देऊन, आमची दादाची जिथें गांठ पडायची त्या ठरलेल्या जागेकडे आम्हांला नेलें. आम्हीं गेल्यावर दादा- लाही थोड्याच वेळांत आणण्यांत आलें ! जिकडेतिकडे भयाण क्रूरतेचें साम्राज्य पसरल्याचा भास होत होता. पण आमचे इकडे-तिकडे कुठेंच लक्ष नव्हतें. दादा आम्हांला बसविलें होतें, तिकडे येतांना दुरूनच दिसूं लागला त्या वेळीं आमच्या बरोबर दिलेला तुरुंगाच्या अधिकान्याचा माणूस दादाकडे पाहून बडबडायला लागला ! त्याचे बडबडणें इतकें हिडीस - इतकें किळसवाणें होतें कीं आम्हां कुणालाच दोघींना ऐकवेना. पण आम्हीं वर पाहिलें नाहीं, कीं, हूं कीं चूं करून, त्याला उलट उत्तर दिलें नाहीं ! " आल्या साळकायामाळकाया भेटायला ! आतां भेटून काय करणार? खून करावयाच्या वेळेला कुठे गेल्या होत्या. आतां आलेल्या आहेत त्या. किती बदमाषानें आतांपर्यंत खून करून पचविले असतील- किती दरवडे गडप केले असतील आतां आलें बाहेर ! - इतक्या सुनांचा शेवट काय ? असाच व्हायचा ! कुणी सांगितलें होतें फंदांत पडायला असल्या?" एक की दोन, त्या माणसाच्या जिभेचा पट्टा चालला ! दादा आमच्याजवळ येतांच त्याला तो म्हणतो :- “ए बदमाष, या बघ तुझ्या छेलछबेल्या भेटायला आल्या आहेत तुला ! बोल त्यांच्यांशी दोन शब्द ! "
 हाय ! काय दादाची ती स्थिती ! वैन्यावरसुद्धां असा प्रसंग नसावा! रत्तूनें दादाला ओळखलेंही नाहीं; इतका दादाच्या चेहयावर त्या थोड्या काळांत इतका विलक्षण फरक झाला होता. आपण कुठे आलों आहोंत -हें काय आहे याचें त्या, अज्ञान बालकाला कांहीं तरी ज्ञान होते का ?"