पान:मजूर.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वें

१६७

वाटे, तेंच पुढे उभे राहातें ' दादाच्या आयुष्याच्या अखेर घटकेचा क्षण आतां जाहीर होणार ! व्हावयाचा होता !
"दादा, आपल्या भेटीची आशा करीत असेल नाहीं बरें ? " मी ताईला म्हणाले ! माझ्यानें दम धरवेना !-
 "ताई, आपल्यालाही त्याला भेटावेसें नाहीं कां वाटत ? थांब, मी भाईला सांगून आपल्याला भेटायला जाण्याची व्यवस्था करवितें !" बबू- ताईनें म्हटलें ! दादाला भेटायला ताई माझ्याइतकीच उत्सुक झाली होती.
 " कशाला ताई ? " मी उत्तरलें ! " भेटायची परवानगी नाहीं मिळाली तर १-पण कर खटपट तरी कर ! उद्यां काय व्हायचें असेल तें होईल. आज दादाला डोळे भरून पाहूं ये ! तो आपण त्याच्या जिवंतपण एक- मेकांचा निरोप घेऊ ! दोन शब्द बोलतां आले तर पाहूं या ! "
 " ताई अशी निराश कां होतेस ? " तशाही स्थितींत बबूताई मला शुष्क धीर देऊ लागली.
 "आपण दिलेले बॅरिस्टर बी. सदाशिवराव फार हुशार आहेत ! त्यांच्या- मुळें संतुदादा दोषमुक्तं होणार नाहीं कशावरून ? "
 " हो - शेवटच्या क्षणापर्यंत तशी आशा तरी बाळगूं या ! " ही आशा निराशेंतही आमच्या डोळ्यांत डोकावत होती ! ताईनें भाईला सांगितलें. भाईनें जाऊन खटपट करून, आम्हांला तीन चार तासाच्या आंत परत येऊन परवानगी मिळवून दिली ! दादाला तुरुंगांत भेटावयाला, मी, रत्नु, आणि बबूताई निघालों !
 "बबूताई, तुझे, आणि भाईचे हे उपकार आम्ही कोणत्या जन्मीं आणि कसे फेडावयाचे १ इतकें झालें तरी तुम्हीं आमच्याकरितां इतके श्रम सायास करतां ? प्रत्यक्ष 'दादा'च बाबांचा संशयी खुनी म्हणून पक- डला गेला असला तरी त्याच्यासाठींच तुम्ही प्रेमच बाळगतां ? आणि त्याच्या बचावाची तजवीज करतां ! काय म्हणावें तुम्हांला ? काय नांव द्यावें तुमच्या स्वभावाला ? ताई, आमच्या चामड्याचे जोडे जरी तुमच्या पायांत घातले – ”
 " ताई, असें बोलूं नकोस गडे ! - माझी तुझी स्थिती निराळी आहे काय ! मी तुझ्या करितांच करतें आहे का ? माझ्या करितां नाहीं बरें