पान:मजूर.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १ लें.

 " होय का ? - मग संतुरामाला गिरणीतून यावयाला बराच अव- काश आहे ! "
 " होय ! "
 आज संतुरामाचा गेल्या महिन्याचा पगार हाती येईल नाहीं ?"
 " होय "
 सुगंधा ! "
 'काय आई ? -आई, एकादें देवाचें गाणें म्हणूं का ? होईल का तुझी करमणूक ? "
 " नको ! मी देवाचें नांव घेतेंच आहें ! पण बाळ, संतुराम लवकर नाही का ग यायचा ? - तुला त्याची गिरणी माहिती आहे का ?
 " नसली तरी शोधून काढीन !”
 "मग तो लवकर आला तर बरे होईल ? "
 " कां ग १ - "
 "काय सांगू तुला बाळ ! संतुराम ऑफिसांतून यायच्या आत मी - मेले तर, मग माझी त्याची गांठ कशी बरें पडेल ? - मला त्याला दोन शेवटचे शब्द सांगायचे आहेत. त्याला डोळे भरून पाहावयाचें आहे ! तुला नी रत्नुला नीट संभाळायला सांगून, तुझ्या योग्य स्थळ तुला पाहून तुझ्या जन्माचं कल्याण करण्याची जबाबदारी त्याला समजावून द्यावयाची आहे ! आणखी - "
 आणखी काय ?" मी मध्येच म्हटलें, " आणखी काय ! - आई, हें काय बरें भलते सलतें बोलते आहेस. तूं जर असं म्हणायला लाग- लीस - असा धीर सोडलास तर कसें बरें होईल !" असें म्हणतां म्हणतांच माझ्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहूं लागला !
 "रडूं नको सुगंधाबाळ ! आतां रडून काय होणार ! जे व्हायचें तें चुक- णार कोठून ! माझा आज कांहीं भरंवसा वाटत नाहीं. मलातरी तुमच्या- सारख्या आवडत्या चिमण्यांना सोडून जावेसें वाटतंय का ! पण 'देवा- जया बोलण्याला मान दिलाच पाहिजे ! म्हणून म्हटलें संतुरामबाळ जर लवकर आला – "