पान:मजूर.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
मजूर

गृहस्थ मजुरांच्या अत्याचाराला बळी पडला, याबद्दल अत्यंत वाईट वाटतें ! शेटजीसारखा नागरिक नाहींसा झाल्याबद्दल मुंबईला इळ- इळ वाटल्यावांचून राहणार नाहीं ! शेटजींच्या खुनाचा परिणाम चालू मजुरांच्या संपावर ' कसा काय होतो पहावें ! ईश्वर मृताच्या आत्म्यास शांति देवो !
 हर ! हर ! काय गहजब हा !! गरीबांचावाली जगांत परमेश्वर देखील कसा असत नाहीं ? संकटपरंपरा तरी किती गरीब- पापभीरूंनी सोसावयाची ? शेटजीसारख्या सज्जनाचा नाहक खून ! निरपराधी, निरु- पद्रवी, निःसहाय, असा दादा 'खुनी' म्हणून संशयीत म्हणून पक डला गेला !! हेंच का जग ? हाच का जगाचा न्याय ?
 बबूताई माझ्याकडे मी बबूताईकडे पहात बसलों होतों ! मला वाटतें, मला वेडही लागलें होतें. भाबड्या बबूताईची माझ्याचसारखी स्थिति झाली होती. इच्छारामभाईच्या शवाची सरकारी रित्या पाहणी वगैरे काय व्हावयाची ती झाली. त्यांच्या अंत्यविधीला दुसरे दिवशीं संध्याकाळच्या सुमारास परवानगी मिळाली. व मग शेटजींच्या शवाला अंत्यसंस्कारा करितां उचलण्यांत आलें ! आम्हांला मात्र परिस्थितीनें दाही दिशा शून्य झाल्या होत्या !!