पान:मजूर.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १६ वे

१६३

 एका नुसत्याच बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रानें विश्वसनीय म्हणून खुनाची इत्थंभूत बातमी खालीलप्रमाणें प्रसिद्ध केली होती !
 "इच्छाराममाईचा खून करणारा माथेफिरू मजूर, त्यांच्याच गिर- गीतला असून तोच संपांत मुख्य होता. संपाच्या वेळी शेटजीवर दगड फेकण्याचा त्याचा विचार होता. पण तो साधला नाहीं. शेटजी त्याला फार भीत होते. त्याला टाळीत होते. परंतु वेळच आली त्यांत संपांत हाल होऊन सदर मजुराची आई अन्नावांचून मेली ! याला कारण इच्छाराम भाईच असें त्याच्या मनानें घेतलें ! आणि ज्यांच्या निर्दयपणा- मुळे आपली आई मेली-त्या शेटजींचा 'खून' करावयाचें त्यानें ठर विलें ! आपले कांहीं मजूरसाथीदार बरोबर घेऊन बंगल्यावर गेला. या त्याच्या साथीदारांना पुष्कळांनी बंगल्याच्या बाहेर घिरट्या घालतांना पाहिलें होतें ! शेटजी जेवणखाण करून आपल्या मुलामुलीशी गोष्टी बोलत असतां, हा मजूर तिथे गेला. शेटजींना वेड्यावाकड्या शिव्या देऊं लागला. 'माझी आई संपत उपास काढून मेली- तुम्हीं कां जगावें ? म्हणून शेटजींनाच विचारू लागला ! शेटजींना तो जागचा हलूं देईना - त्यांच्या समजुतीच्या गोष्टी ऐकेना ! - तुमचा बंगला पेटवून देतों- तुमच्या मुला माणसांना आणि तुम्हांलाही त्यांत भाजून टाकतों-माझे पन्नास जवान् बाहेर उभे आहेत ! बडबड कराल तर खबरदार ! तशीच त्यांच्या मुला- नाहीं दशहत घातली ! कोण काय करणार तिथें ? शेवटीं खिशांतून पिस्तूल काढून शेटजी आंत पळून जायच्या प्रयत्नांत असतां त्यांच्यावर रोखून झाडलें ! आणि काम होतांच पिस्तूल खालीं टाकून देऊन शेटजींच्या मुला पुढे जाऊन तो उभा राहिला ! मला पकडा ! मी पळून जात नाहीं ! मला सरकारच्या स्वाधीन करा ! ' माझ्या आईच्या मृत्यूनें माझें मस्तक फिरून शेटजींचा खून केला ! मला आतां जगांत जगावयाचेंही कारण नाहीं !' असे म्हणू लागला, पिस्तुलाचे बार होतांच त्यांचे साथीदार जीवाच्या भयानें त्याला सोडून पळून गेले. पुढे काय झालें, हें बाकीच्या पत्रांतून सविस्तर आलेच आहे ! पोलिसांनी मजुराला पकडलें असून- त्याची रीतसर चौकशी एक दोन दिवसांत सुरू होईल. शेटजीसारखा धीरोदात्त आणि गरीबांच्या सुखदुःखाकडे सहानुभूतीनें लक्ष पुरविणारा