पान:मजूर.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
मजूर

हें झालें. पण दादा कुठेच दिसेना, कुठे आहे, रात्रीं आला होता काय ? हें विचारावयाचेंही भान झालें नाहीं, कीं धीर झाला नाहीं !
 आम्हीं असें बोलतो आहोत, तोंच खुशालचंद मॅनेजर तेथे आले. त्यांचा चेहराही विचित्र - झाला होता. आम्हां सगळ्यांकडे त्याने एकदां पाहिलें. भाईची एक फेरी संपून आतां, त्याच्याकडे तोंड झालें !
 “ आलांत ?–-” भाईनें त्याच्याकडे पाहून म्हटलें.
 " झाले कसें हें भाईसाहेब ? मला टेलिफोन पोंचतांच मी तडक निघालो ! - शेटजींचा खून किती वाजतां झाला !-कोण दुष्ट-नीच पाजी लोक असतात हे ? ” बोलू लागला. भाई कांहीं बोलला नाहीं !
 'शेवटी शेटजींचा खून हलकट संत्यानेच केला ना ? भाईसाहेब, राग येऊ देऊ नका ! पण त्या पाजी माणसाला तुम्हीं आणि माईसाहेबांनी जवळ केल्याचा परिणाम ! संत्या नुसता सर्प आहे ! दूध पाजणारावर उलटणारा--"
 'काय ? संतुदादानें खून केला शेटजींचा ?" मॅनेजरचे कडकडीत शब्द माझ्या कानांत घुसतांच, मी ओरडलें ! या वेळीं माझी स्थिति कशी झाली असेल याची कल्पनाच केली पाहिजे !
 बबूताईनें आपली अधिकच मिठी घट्ट केली !
 " बबूताई, काय ऐकतें मी हें ? माझा दादा खुनी ? शेटजींचा दादानें खून केला ? दादा कुठे आहे ?. मी बबूताईला एकसारखी विचारीत सुटलें.
 भाईसाहब, मी जर खुनाच्या प्रसंगी हजर असतो, तर खात्रीनें सांगतों, की तिथल्या तिथें त्या संत्याचा खून पाडला असता ! मग मागें पुढे काय झालें असतें पाहिलें असतें !--बाकी पापाचें प्रायश्चित्त मिळा- ल्याखेरीज सुटत नाहीं म्हणतात, तें कांहीं खोटें नाहीं ! पोलिसांनी संत्याला लागलीच "खुनी" म्हणून पकडून नेला ना ? बरा सांपडला, नाहीं तर बदमाष, ताबडतोब निसटायचा ! -- पण त्याला सुचलेंच नसेल ! खून झाल्यावर, तो भुलला असेल म्हणून सांपडला त्याच्या कर्माचं त्याला योग्य प्रायश्चित्त मिळेल, हें खरें पण शेटजींचा लाखाचा प्राण हकनाक गेला कीं नाहीं ? हलकाटाला हातीं धरलें म्हणजे असा प्रसंग यावयाचा !