पान:मजूर.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १६ वें 66 ' ताई - ताई - " बबूताईला हुंदका आवरेना ! “ताई, काय सानूं तुला ? " 66 काय झाले ताई ? " बबूताईच्या डोळ्यांतील पाणी, आणि तिची ती केविलवाणी स्थिती पाहून माझ्या डोळ्यांतूनही पाणी यावला लागलें! आईच्या वियोगानें अधू झालले आधीचे मन-एवढ्या तेवढ्या प्रसंगानेंही असल्या करुण प्रसंगांत विरघळून जात असे ! " काय झाले ताई १ सांग ना मला ? " "ताई, माझ्या बाबांचा रात्रीं खून झाला !!" ताईनें एवढेंच कसें बसें बोलून दोन्हीं हातानी आपले तोंड झांकून घेतले ! “ अगबाई ! खून ?" मी जागच्या जागींच मटकन बसलें !! ध्यांनीं मनीं, स्वप्नीं, नसतां हें झालें ! बबूताई रडते आहे, मी रडते आहे, हें पाहून रत्नू दीनपणानें आमच्याकडे पाहू लागला. बंगल्यांत येण्याच्या आधीच त्याची टवटवी पार नाहींशी झाली होती ! ताईला जाऊन जवळ घेतलें, तिचें मस्तक माझ्या खांद्यावर घेऊन दोघीही रडुं लागलों. भाई• च्यानें कांहीं बोलवेना ! त्याचेंही मूक रुदन चाललें होतेंच ! ताई, हे कसें ग सहन करूं ? -" शोकातिरेकानें हुंदके देत बबू- ताई म्हणाली. 66 काय करायचें बबूताई !” "नाहीं ग ताई, देव आमच्यावर किती कोपायचा ग ? बबूताईला वेडे होण्याची वेळ आली. 66 " बबूताई हे काय ? तुझ्यावरचा प्रसंग - " बबूताईनें माझ्या तोंडा- वर मध्येच हात ठेवला. " ताई माझ्यावरील प्रसंगापेक्षांही तुझा कठीण हे मी जाणतें ! पण ताई काय करूं ? - किती मी दुर्भागी ! ताई तुझ्या माझ्या प्रेमाचा शेवट बाबा गेले, आणखी-आणखी बबूताई काय बोलत होती, काय सांगणार होती ? मला कांहीं कल्पना येईना ! भाई खुर्चीवरून उठून जड पावलांनी एरझारा घालूं लागला होता ! बबूताई काय बोलेल, सांगेल तें निमूट ऐकून घेण्याशिवाय सोय नव्हती!