पान:मजूर.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १६ वें

१६१

नाहीं असें होतच नाहीं ! भाईसाहेब, तरी मी संशय येतांच डायरेक्ट- इन्डायरकेट याबद्दल तुम्हांला वेळोवेळी हिंट देत होतों ! तुम्हीं दुर्लक्ष केलें ! शेटजी तर काय ? ईश्वरावतार ! जगांत त्यांना सगळींच माणसे आपल्यासारखीच दिसत असत ! ! हं! या माजोरी मजुरांनीं अखेर शेटजींचा बळी घेतलाच !! तरी बरें, भाईसाहेब, शेटजी पहिल्या• पासून 'मजुरांचेच' कैवारी म्हणून होते ! मला हेंच आश्चर्य वाटले की, संत्याला -दरिद्री, माजोरी, उर्मट मजुराला -शेटजींनीं मुलाखतीला कसें येऊं दिलें ?- सरकार संत्याला योग्य शिक्षा ठोठावील; पण शेटजींचा प्राण त्यामुळे येणार आहे थोडाच !--"
 " खुशालचंद ! माफ करा ! तुम्हीं एक अक्षर देखील बोलू नका !" मॅनेजरची टकळी, बबूताईनें बंद केली ! त्याच्या एकेक वाक्याने इंग- ळ्याच्या विषारी वेदना होत होत्या ! मी तर त्या सर्व एकाहून एक अप- राधांच्या आरोपांच्या पर्वताखाली चिरडून जाऊन बेशुद्धच झालें होतें !
 "भाईसाहेब, कोण हा आपल्यावर अशा अल्पवयांत कठीण प्रसंग ! मला मोठें वाईट वाटतें I really feel for it! करावयाचें काय ! जग- रूढीकडे लक्ष दिले पाहिजे ! तुमच्यावर आलेली जबाबदारी तुम्हांला शिरावर घेतलीच पाहिजे ! शेटजींचा लौकिक कायम ठेऊन वाढविण्याची कामगिरी तुमच्याकडे आहे ! " मॅनेजरचा मुरदाडपणा चाललाच होता! मला कल्पनाच नाहीं ! आपला टेलीफोन आला त्या वेळीं मला तें खरेंच वाटेना! कसें खरें वाटणार ? दुपारीच शेटजींना मी भेटून गेलों होतों ! भाईसाहेब, जसा तुमच्यावर तसा आमच्यावरही प्रसंग आहेच. आम्ही आपल्या दुःखाचे भागीदार आहोत. आतां, शेटजींच्या पाठीमागे आपल्याला कामाचा व्यवहाराचा - लोकांचा पूर्ण अनुभव येईपर्यंत मला वास्त दक्षतेनें रहावें लागणार आहें. मी राहीन. माझें कर्तव्यच आहे तें ! शेटजींचें माझ्यावर तितकें ऋणच आहे ! "
 " खुशालचंद, या गोष्टी आपण बोलूंयाच नको ! या गोष्ठीचा विचार करायला लागेल तितका पुढें वेळ आहे. माझें या वेळीं डोकें नाहीं ठिकाणावर, तेव्हां—"
 म... ११