पान:मजूर.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
मजूर

बनूताईच्या बंगल्यांत शिरलों! बाहेर कुणीच दिसलें नाहीं. अजून आंत बाहेर कुठेही झाडून काढलें नव्हतें ! बंगल्यांत शिरतांच नेहमीं सारखी प्रसन्नता वाढली नाहीं. सकाळची वेळ असून बंगल्यांत प्रसन्नता कां दिसेना ? कोणी गडी माणूस सुद्धां कां आढळेना ? - जसजसें इकडे तिकडे डोकावून पाहूं लागलें, तसतसे बंगल्यांत उदासवाणेच दिसावयाला लागून मनाला कसेंसेंच वाटावयाला लागलें !-
 नंतर मी तशीच पहिल्या दिवशीं या बंगल्यांत आलें असतां, ज्या जात बबूताईने आम्हांला बसविलें होतें, त्या जागेकडे गेलें. तिथें कांहीं मंडळी असावीसें वाटलें. आंत जाण्यापूर्वी मी डोकावून पाहिलें. तों वबूताई कोचावर अस्ताव्यस्त स्थितीत पडली असून, पलिकडच्या खुर्ची. वर भाई, पाय वर घेऊन हात छातीवर स्वस्तीकाकार घेऊन, मान खालीं घालून बसला असून, दोघांचीही तोंडें अगदीं सुकून गेलीं आहेत ! माझ्या काळजात धस्स झालें ! आमच्या पावलांचा आवाज झाला ! म्हणून दोघांही भावडांनी वर आमच्याकडे पाहिलें-आम्हीं दोघांनी आंत पाऊल टाकलें ! आम्हांला भाईने पाहिले पुन्हां मान खाली घातली ! बबूताईनें आम- च्याकडे पाहिलें - तशीच पहात राहिली पण नेहमी सारखी आम्हांला पाहतांच उठून धांवत यायची, आम्हांला धरावयाची, रत्नुला उचलून कोचावर नेऊन ठेवावयाची तसें कांहीं झालें नाहीं ! आम्हांला पाहिलें, आणि बबूताईच्या डोळ्यांतून घळघळ घळघळ पाण्याची धार लागली ! ती आम्हांला नुसती ये देखील म्हणेना ! भाई कीं बबूताई कोणीच बोलेना ! भाईनीं तर तोंडच लपविलें. मी तरी काय बोलूं ? बबूताई कां रडते ? मी अशा वेळी-अवेळीं आजवर, आणि आपण होऊन बंग- ल्यांत कधींच आलें नसतां, आज आले, तर याचें देखील बबूताईला कांहीं वाटलें नाहीं !
 " ताई - " अखेर धीर करून मीच खोल आवाजांत हांक मारली- बबूताई उठून बसली.
 'ताई, अशी कां तुम्हीं बसलांत ? तूं कां रडतेस ? मला नाहीं का सांगण्यासारखे ? " मी विचारण्याचे धाडस केलेंच !