पान:मजूर.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १६ वें

१५७

 शाळेत जाणें नाहीं, कांहीं नाहीं. अशी स्थिती होती. कधीं तरी अधून-- मधून पोथी आई करितां वाचीत असे, तेवढेच वाचन !
 पहाट झाली ! पश्चिमेकडच्या खिडकीतून गारवाऱ्याची झुळूक यायला लागली. रस्याची गडबड, धडधड, सुरू झाली ! रत्नुही जागा- झाला. आणि त्याने विचारले, "ताई. दादा कुठे आहे ? त्यानें मला उठ विकां नाहीं ? इतक्या लवकर बाहेर कां गेला ? "
 रत्नु, रात्रीं दादा बाहेरून आलाच नाहीं ! मग तुला उठायला कशी हांक मारणार ? " मी ग्नुला सांगितलें.
 आला नाहीं दादा ?-कुठे गेला आहे रात्रीं ? " रत्नुनें विचारलें. आपल्या बबूताईकडे ! " भी सांगितले.
 नव्या ताईकडे ? - मग मला नाहीं नेलें ? तू नेतेस पण दादाने नाही. नेलें ? " रत्नुला दादाचा राग आला. मी कांहींच बोललें नाहीं !
 ताई, आपण नव्या ताईकडे जाऊं या नव्या ताईला सांगूं की दादा आम्हांला चुकवून आला, पण आम्हीं कसे आलों ? आणखी किनई पुन्हां आपण जाऊं तेव्हां दादाला न्यायचेच नाहीं बरें का नव्या ताईकडे ! " रत्नुच्या या बोलण्याने मला हंसूं आल्याशिवाय राहिलें नाहीं मी उठलें! तोंड धुणीं, वेणीफणी झाली ! चहाची वेळ होऊन गेली. आठ वाजले तरी दादाचा ठिकाणा नाहीं. मला काळजी वाटा- यला लागली. रत्नु ताईकडे चल म्हणून हट्ट धरून बसला ! आणखी थोडा वेळ वाट पाहिली. त्याचें तोंड धुणे झाले. त्याने खायचें करून घातलें, तो खाईना. अगोदर ताईकडे चल म्हणून हटून राहिला! रडायला लागला. आतां काय करणार ? त्याच्या म्हणण्यासाठीं त्याला कपडे करून बबूताईकडे निघणे भाग पडलें. खालीं आलें फ्लोरा फाउंटनकडून येणारी ट्रॅम मिळाली ! बबूताईच्या बंगल्यावर निघालो.
 ट्रॅमच्या स्टेशन असून बबूताईचा बंगला तरी बराच दूर पडला. रत्नुला, थोडा चालत, थोडा कडेवर, असें करीत करीत कशीतरी आम्हीं मजल गाठली ! या चालण्याला आणि कडेवर बसण्याला रत्नु कंटा- ळला ! त्याला वाटलें नव्या ताईकडे जायला मोटार असते, मग आजच कां नाहीं ?