पान:मजूर.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १६ वें
' दैवो दुर्बल घातकः ! '

ताई-ताई दादा कुठे आहे ग ? इतक्या लवकर बाहेर गेला ? - सकाळी सहा वाजले होते. मी आणि रत्नु अजून अंथरुणांतच होतो. रत्नु जागा होऊन दूर होता तो मला येऊन चिकटला ! रोज आम्हां दोघांला दादाच जागा करीत असे. आज ' जागे व्हावयाला दादानें हांक मारली नाहीं. म्हणून रत्नुला नवल वाटलें. त्याला वाटले आपल्याला हांक मारल्याशिवाय दादा गेला कसा ?
 रात्री दादा घरींच आला नाहीं. मी किती तरी वेळ वाट पाहिली. दोन - तीन वाजेपर्यंत मला झोंपही आली नाहीं. ' इतकें कसलें रात्रभर बोलणें चालले असेल कोण जाणें !" असें मनांत येई. तर पुन्हां वाटे, फार -रात्र झाली, तर शेटजी, भाई, बबूताई त्याला कसा येऊ देतील ? पण पुन्हांवाटे कांहीं झालें तरी दादा राह्यचा नाहीं. मग कां राहिला ? मनाची कशी तरी समजून करून घेतली. देवाचें नांव घेतलें. मी झोंपेचा डोळे मिटून प्रयत्न करूं लागलें. झोप आली. पण मनाच्या अत्यंत अस्व -स्थतेमुळे अनेक वेडीवाकडीं भीतिदायक स्वप्ने पडत होतीं. मध्येच एक अतीशय अमंगल - हिडीस-भीतिप्रदस्वनामुळे मी खडबडून जागी झालें !
 स्वप्नानें जागी झाल्यावर मग पुन्हां झोंप लागली नाहीं. मन इकडच्या तिकडच्या विचारांत सारखे झोके घेत होतें. ' असें कां बरें वाईट स्वप्न पडावें ?” असें वरचेवर वाटावयाला लागून मनाला हुरहूर वाटू लागली. देवाचे नांव घ्यायला लागले, देवाचे नांव तोंडाला येईना. थोडा वेळ घेतल्यासारखे करावें पुन्हां नको वाटावें ! समोर आईच्या जागेचा दिवा दिसावा- वाटे, आईला चारपांच दिवस झाले आई एकदाही स्वप्नांत- सुद्धां आली नाहीं, ' आतां आमचें कसें व्हायचें ? आम्हांला बरे दिवस -कधी तरी येतील काय ? असाही भुर्रकन विचार मनांत मधूनच येऊन जाई ! अलिकडे कित्येक दिवस अभ्यास नाहीं, पुस्तक वाचन नाहीं-