पान:मजूर.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १५ वे "संतूराम ! कांहीं असो, अशा बिनतोड परिस्थितींत-यावेळी आम्हांला प्रत्यक्ष जरी खुनी नाहीं, तरी खुनाच्या बाबतींत संशयी म्हणून तुम्हांलाच पकडावे लागत आहे!" इन्स्पेक्टरसाहेबांनीं पिस्तूल आणि दादाला आपल्या हाताखालच्या अंमलदाराच्या ताब्यांत दिलें ! " काय खुनाच्या बाबतीत मी संशयीत ?" दादानें विचारलें ! त्यांच्या डोळ्यापुढे अंधेरी आली ! तो खाली बसला ! " काय ? संतूदादा खुनी ? बबूताई तादिशी बसल्या जागेवरून उठली ! पण एवढेच म्हणून फिरून ती जागच्या जागींच बसली ! दादाला पोलिस अधिकाऱ्यांनीं गिरफ्दार केलें ! " आणखी हें काय झाले ? " भाईचबूताईच्या तोंडांतून एकच 66 उद्गार निघाला ! 66 भाईसाहेब, हें पिस्तूल, हे गृहस्थ, ही वेळ, इथे कोणीं आलें गेलें नाहीं, असें हेंच सांगतात-यावरून आम्हांला याच गृहस्थाला 'संशयी म्हणून धरण्याशिवाय गत्यंतर काय ? यांच्याशिवाय दुसऱ्या कोणावर आपला वाहिम असला, त्याचें नांव सांगा, पुरावा गोळा करा ! यांची चौकशी होईलच ! आतां घेऊन जातों ! आमचे सी. आय डी. इन्स्पे-- क्टर बरोबर आहेत, त्यांनी आपल्या बंगल्याची पहाणीही केली आहे.. त्यांच्याही अभिप्रायाचा चौकशीच्या कामी उपयोग होईलच ! दादावर एकापेक्षां एक किती विलक्षण आणि अनपेक्षीत प्रसंग हे ? दादा इन्स्पेक्टर साहेबांच्या बरोबर चालू लागला. बबूताई वेड्या- सारखी पोलिसांच्या गराड्यांत सांपडलेल्या दादाकडे पहात राहिली होती ! शेट प्रेमचंदभाई, खालीं मान घालून उभा राहिला होता! इन्स्पेक्टर मंडळीसह निघून गेले.