पान:मजूर.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
मजूर

 कलों- आणि शेटजींच्या जवळ धांवत आलों. तोंच ही सगळी मंडळी जागी होऊन गोळा झालीच ! "
 " बरें हैं पिस्तूल – इथें प्रथम कोणी पाहिलें ? " " मी !” भाईनें उत्तर दिलें !
 " कुठे पडलें होतें ! - " भाईनें जागा दाखविली !
 "तुम्हीं तुमची मुलाखत चालली असतां कुठे बसला होता?" दादाला विचारण्यांत आलें.
 या ठिकाणीं ! "
 मुलाखतीचा शेवट कोणाच्या रागांत आणि कोणाच्या लोभांत झाला होता ? "
 " दोघांच्या लोभांतच झाला होता ! " दादा उत्तरला !
 सी-आय-डी चे इन्स्पेक्टर हें बोलणें चाललें असतां, जिन्याच्या तोंडाजवळ एक खिडकी होती, तिच्या जवळ जाऊन आंत बाहेर, सूक्ष्म रीतीनें निरीक्षण करीत होते. खिडकीपासून जमीन किती खालीं आहे, बाहेरच्या बाजूला उभे राहतां येण्यासारखी जागा आहे का ? बाहेरूनच खिडकीपर्यंत चढून येण्यास वाव आहे कीं नाहीं; याबद्दल ते मनाशीं पडताळा पहात होते ! पाहून त्यांनीं आपल्या मनाशीं कयास बांधलाही असेल ! -
 शेटजींचा तुमचा कांहीं खाजगी हेवादावा करण्यासारखासंबंध आहे काय ?
 " नाहीं ! " भाईनेंच या प्रश्नाचे उत्तर दिलें. " आमचा चांगला घरोबा आहे ! "

उलट यांचा  मग मुलाखतीला तुम्हांलाच का बोलावले १ दुसऱ्याला कां कुणाला बोलाविलें नाहीं ? "
 " मी त्यांच्या गिरणींतला प्रमूख म्हणून आणि मजुरांच्या संपाचा निकाल माझ्याजवळ त्यांना सांगावयाचा होता म्हणून ! "
 संपाचा निकाल तुम्हाला अनुकूल आहे कीं प्रतिकूल ?
 " अनुकूल ! "