पान:मजूर.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १५ वे

१५३

 कशाबद्दल मुलाखत होती ? " इन्स्पेक्टर विचारीत होते.
 " गिरणीच्या संपाच्या बाबतीत बोलायचें होतें !  शेटजीना कांहीं माहिती हवी होती. आणि शेटजी मला कांहीं सांगणार होते !"
 " गिरणीच्या संपाशीं तुमचा काय संबंध ? "

 " संपांत मी मजुरांच्या बाजूनें काम करीत असतों ! " 'तुम्ही कोणत्या गिरणीत असतां ? "
 " शेटजींच्याच 'उच्छाराम भाई-- मिलमध्यें ! "
 " मुलाखतीच्या वेळीं आपल्या दोघांशिवाय कोणी नव्हते ?
 " सुरवातीला तास सव्वातास, शेटजींचे हे चिरंजीव आणि त्यांची ती मुलगी - दोघेही होतीं ! "
 " मग १ "
 (मग शेवटपर्यंत आम्ही दोघेच होतों ! "
 मुलाखत बरीच कडाक्याची झाली असेल ? "
 " कोणत्या अर्थाने आपण विचारतां ? " दादा जरा या वेळीं चपापला !
 " नाहीं म्हणजे - शेटजी गिरणीवाले-तुम्हीं मजूरपक्षाचे ! मुलाखत " संपा'बद्दल ! म्हणून विचारलें !
 मुलाखतीचा सामना - " सलोख्याचाच होता ! "
 मुलाखत किती वेळ चालली होती ? "एक वाजेपर्यंत ! "
 " आणि मुलाखत चालली असतांच शेटजींवर पिस्तूल झाडलें गेले का ? "
 " नाहीं ! "

 मग १ कसें काय झाले ? तुम्हांला सांगतां येईल ? "
 "आम्ही एक वाजण्याचा ठोका ऐकून 'मुलाखत' संपविली आणि शेटजी झोंपावयाला जाण्याकरितां उठले ! मी उठून जिना उतरूं लागलों. तीनचार पायऱ्या गेलो असेन -नसेन इतक्यांत पिस्तुलाचे तीन चार बार झाले ! आणि शेटजी ' अरे बापरे मेलों 'घांबा' म्हणून ओरडले ! मी मागे वळून पाहातों, तों शेटजी धडपडत जाऊन त्या कोचावर जाऊन पडले!! त्यांच्या ओरडण्याबरोबर मी निमिषमात्रच जागच्याजागी थब-