पान:मजूर.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२
मजूर

शेटजींच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यावर जागे होऊन आपण आलों, आणि येथे पाहिलें, तो त्या वेळीं अशी अशी स्थिती ! आपल्याला काय काय दिसलें, एवढेच भाईनें सांगितलें. व नुकतेच सांपडलेले पिस्तूल दाख- विलें. पिस्तूल हातांत घेऊन, इकडून तिकडून निरखून पाहून 'निशाणी' दाखल ठेऊन घेतलें. नंतर बंगल्यांतील सर्व गडीमाणसांना समोर बोला- वून त्यांची नांवेंगांवें, राहण्याची ठिकाणे, बंगल्यांत राह्यची मुदत, वगैरे बद्दल चौकशी केली.
 भाईला "आपला कोणावर वहीम आहे काय ? शेटजींच्या वांकड्यावर कोणी होतें काय ? दिवसांत कोणीं शेटजींच्याकडे परिचित, अपरिचित विशेष कमी कामासाठी आल्यागेल्याचें, वगैरेही विचारलें. नौकराचाकरांची तारंबळ विचारावयाला नको ! त्यांना जरा दरडावून विचारतांव कुणाची बोबडी वळली, कुणी रडायला लागलें. तर कोणी मूच्छी येऊन खालीं पडलें !
 आतां दादावर पाळी आली. ' हे कोण ?' म्हणून भाईला इन्स्पे- क्टरसाहेबांनी विचारलें. दादाबद्दलची स्पष्ट, व शक्य तितकी थोडक्यांत माहिती देऊन म्हटलें, "हे व बाबा रात्री नऊ वाजल्यापासून बोलत होते, आणि शेवटपर्यंत हे इथे होतेच ! - आवाज झाल्यावर आम्हीं धाऊन आलों, त्यावेळीं बाबांना हेच सांवरीत होते. पण पिस्तूल कोणी झाडलें, कुठून झाडलें, याचा थांग लागला नाहीं, आणि यांना कोणी दिसलेही नाहीं ! "
 आतां सरकारची संक्रांत दादाकडे वळली ! बाहेरची सरकारी मंडळी आल्यावर व खुनाच्याबद्दल चौकशीला सुरवात झाल्यावर " बबूताईला मोकळ्या कंठाने रडताही येत नव्हतें ! भयचकित हरिणीप्रमाणें ती जागच्याजागीच मूढ होऊन बसली होती !
 " तुमचें नांव काय ? " इन्स्पेक्टरसाहेबांनीं प्रश्न केला !
 'संतूराम !" तुम्हीं इथें केव्हां आणि कां आला होता ? "
 " मी रात्रीं नवाला - शेटसाहेबांनी मुलाखतीला बोलावलें होतें म्हणून आलों होतों ! " दादा उत्तरला.