पान:मजूर.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १५ वे

१५१

 भाई, आणि त्यांचे नौकर सर्व बंगल्यांत कोणी आल्या गेल्याचा- दडून बसल्याचा छडा काढीत होते ! दादा ज्या कोचावर बसला होता, त्याच्या डाव्या हाताला, - जिन्यापासून दोन फूट अंतरावर एक नुकतेच उडवून पडलेले पिस्तूल भाईच्या नजरेस पडलें ! त्यानें तें उचलून न्याहा ळून पाहिलें. येथें तर हें पिस्तूल पडलेलें आहे ! संतूराम, हे पाहिलेत का पिस्तूल, इथें जिन्याच्या दारांत पडलेले आहे ! आपण आतां कोचावर बसला होता ना ?-
 " होय ! " दादा या वेळीं पूर्ण भानावर आला होता ! ही सर्व परि- स्थिती त्याच्या डोक्याने आकलन केली होती. भाईच्या प्रश्नाला त्यानें उत्तर दिलें !-
 शेटजींच्या शवाला नीट उचलून त्यांच्या आवडत्या आराम खुर्चीवर ठेवण्यांत आलें ! बबूताईचा अविरत अश्रूवर्षाव चालला होता ! नौकर- चारही स्फुंदून स्फुंदून रडत होते ! कित्येक भयचकीत होऊन मरून चूर झाले होते ! दादाच्या मस्तकांत अनंत विचारांचे तुफान माजून राहिलें होतें !
 " भाई ! देखतां डोळ्या हा काय भुताटकीचा प्रकार झाला, याची कल्पनाच होईना मला ! दिवाणखान्यांत आम्हां दोघांशिवाय कोणीही नसतां, कोठून कोणीं पिस्तूल झाडलें, येथे हें पिस्तूल; अगदी मी बसलों होतो तिथे हें पिस्तूल कसें आलें ? हे अत्यंत गूढ चमत्कार - " दादा हें बोलत आहे, तोच पाँ पाँ करीत पोलिस इन्स्पेक्टरची मोटार येऊन धडकली ! सी. आय. डी. इन्स्पेक्टर, त्यांच्या हाताखालील दोन बडे अधिकारी, पोलिस इन्स्पेक्टर व त्याबरोबर चार सशस्त्र पोलीस, बंग- ल्यांत शिरले ! बंगल्याचें फाटक उघडलें ! मंडळी वर आली !
 भाई मंडळीच्या पुढे झाला ! इन्स्पेक्टरद्वयांनीं भाईजवळ हलके हलके बारीक मोठ्या, जरूरी बिनजरूरीच्या आवडत्या नावडत्या बाबींबद्दल चौकशी सुरू केली ! पोलीसांना, बंगल्यांत चोहीकडून फिरून वहिम येण्यासारखी कारणें, खुणा, कांहीं मिळताहेत का पहावयाला सांगितलें ! शेटजींच्या शवाला जाऊन पाहिलें. पालथेंउलथें केलें ! भाईला, त्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरें कशीं देतां येणार ? पिस्तुलाचा आवाज, व