पान:मजूर.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १५ वे

१४९

होता, त्याचें लक्ष पुढें होतें, त्याची पण शेटजींकडे पाठ झाली होती !
 हीच वेळ. हीच शेटजींची, आणि दादाची पोझिशन ! तोंच एकदम फाड् - फाड् — असा आवाज झाला !
 "बापरे ! मेलों ! मेलों ! मेलों !" म्हणून शेटजींच्या तोंडून उद्गार निघत शेटजी धडपडत चार दोन पावले पुढे चालत जाऊन प्रेमचंदभाई - बसला होता, त्या कोचापर्यंत कसें तरी जाऊन त्यावर पालथे पडले ! ! पडले ते " अगाई ! मेलों हें काय झालें ? धांवा ! धांवा ! भाई, बबे ! राम ! राम !"
 डोळ्याचें पातें लवण्याच्या आंत शेटजींचें प्राणोत्क्रमण झालें ! फाड् फाड् फाड् असा आवाज आणि 'मेलों- मेलों' हें शेटजींचे शब्द खालीं जाणाऱ्या दादाच्या कानांत घुसले ! तो चक् होऊन वळून पहातों तों काय ? तो पर्यंत शेटजी कोचावर जाऊन पडले ! एकच निमिष ! दादा जागच्याजागी उभा होता ! " हें काय ? हें काय ? कोण आहे ? शेटजी शेटजी, काय झालें - करीत दादा परत फिरून शेटजींच्याकडे धांवला ! बाराचा आवाज आणि शेटजींचें मेलों धांवा ! चोर ! खून ! " असा भेदूर आवाज ऐकून, बंगल्यांतील नोकरचाकर- भाई, बबुताई जागी होऊन " काय ? काय ? - कोण ? " म्हणत दिवाणखान्यांत सर्व गोळा झाले !!
 पहातात तो काय ? इच्छाराम शेटजींचा खून झालेला !!!
 भाई, दादा, नौकरचाकर सगळेच हतबुद्ध झाले ! सगळ्यांच्याच डोळ्यावरची झोंप पळाली ! एकदम वस्तुस्थितीचे भेसूर चित्र त्यांच्या डोळ्यापुढे उभे राहिलें ! बबूताई "बाबा, बाबा, " करीत शेटजींच्या अंगावर पडली ! प्रेमचंदभाईने एकदम ओरडून नोकरचाकरांना " खिडक्या, दारें, लावायला सांगितलीं ! " चोर, खुनी, पकड़ा ! जाऊं देऊं नका ! " म्हणून सांगितलें! दादाची विचारशक्ति नष्ट झाली होती ! चबुताई, शेटजींच्या शवावर धाडकन् पडली, तेव्हां दादा दगडीनुतळ्या- प्रमाणें जागच्याजागीं तटस्थ उभा होता ! नोकरचाकर खिडक्या दारें लावायला धावले ! खिडक्या लावल्या. मुख्य दारें तर अगोदरच लावलीं!