पान:मजूर.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
मजूर

मुलीवरील प्रेम त्यांचें आपल्यावरील प्रेम यांची तपशीलवार माहिती दादाला अगदीं स्नेहभावानें देऊ लागले.आपल्या मुलीजवळ गरीब श्रीमंत लहान मोठा, हा भेद मुळींच नाहीं.आणि तिला तो कळतही नाहीं. मुलगी फार प्रेमळ, गुणी, पापभीरू, आणि सत्कार्यदक्ष आहे. आपला मुलगाही विलायतेला जाऊन आला आहे, पुष्कळ ज्ञान संपादन करून आला आहे, पुढे लवकरच त्याला इथल्या मिल- ओनर्स असो- सिएशनचा अध्यक्ष निवडण्यांत येणार आहे. तो आपल्या कारकीर्दीत तर 'मजुरां'ना चांगले दिवस आणील, अशी माझी खात्री आहे ! मजु- रांच्या सद्यःस्थितीबद्दल साद्यंत माहिती आणि खरोखरच गिरणीवाल्यांनी मजुरांच्या बाबतीत काय केलें पाहिजे, हें आमच्या भाईनेंच मला नीट समजावून सांगितले, वगैरे वगैरे म्हातारा अगदी घरोब्याच्या नात्यानें सांगत होता. दादाला तें ऐकून घेणें भाग पडलें होतें. आपल्या मुला- मुलींच्या अनेक लहान मोठ्या गोष्टी सांगण्यांत, दादाचें कल्याण चिंतावें खुशालचंदासारखीं माणसें आपल्या पदरी असतात, आपल्याला त्यांच्या स्वभावाची कल्पना होत नाहीं, म्हणून पुष्कळ वाईट गोष्टी होतात, निष्कारण गैरसमज वाढत असतो ! पुढे मागें तुमच्या आंगचे गुणच तुम्हांला श्रेष्ठपदाला चढवतील, तुमच्यासारखे जबाबदारीचें काम करावयाला खुशालचंदासारख्याच्याऐवजीं मिळतील, तर असले मजुरांच्या त्रासाचे, आणि गिरणीवाल्यांच्या निष्कारण नुकसानीचे प्रसंग फारच कमी याव- याचे ! — याप्रमाणें म्हातारा सारखा बोलत राहिला होत। !
 बंगल्यांतल्या मोठ्या घड्याळ्यांत एकाचा ठोका पडला ! " अरे ! एक वाजल। ! बोलण्याच्या नादांत खूप वेळ झाला ! बरे आहे, संतुराम, उठूं या आतां ! येत चला वरचेवर ! " शेटजींनीं उद्गार काढले ! शेटजी उठले, दादाही पण उठला !
 आईचें सुतक नसतें, तर दादानें शेटजींच्या पायांवर निघतांना आपलें डोके ठेविलें असतें. पण त्याचा नाईलाज होता. त्याबद्दल दादाला फार वाईट वाटले! शेटजींचा निरोप घेऊन दादा निघाला. जिन्याच्या एक दोन पायऱ्या उतरला. शेटजी खुर्चीवरून आपल्या निजायच्या जागेकडे निघाले; शेटजींची जिन्याकडे पाठ वळली - दादा जिन्यांतून चालला