पान:मजूर.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १५ वें
इच्छारामभाईंचा खून !

 इच्छारमभाई व दादा यांचे चांगले दोन अडीच तास बोलणें चाललें होतें. दादाच्या बोलण्यानें शेटजींचे फारफार समाधान झालें होतें. ते दादाकडे दादा बोलत असतां अत्यंत कौतुकाने पहात होते ! आपलें प्रत्येक बोलणें शेटजी लक्षपूर्वक, कळकळीनें ऐकून घेत आहेत, हें पाहून शेटजींच्या संबं धांत अगोदरच असलेला आदर शतगुणीत होत होता ! शेटजींनीं दादाचे सगळे बोलणें - सगळा विचार ऐकून घेतल्यावर आनंदाची बातमी म्हणून गोड वर्तमान सांगितलें तेव्हां दादाला विलक्षण आनंद झाला ! असे शेटजी सारखे लोक आहेत, म्हणूनच मजुरांची दाद लागली. -- मजु• रांच्या विषयीं मत जरी आपल्या कडून काढून घेतले, तरी त्याचा सांगोपांग विचार शेटजींनी यापूर्वी केलेला आहे, त्यांना सर्व माहिती आहे, आणि शेटजी मजुरांचे कैवारी आहेत, म्हणूनच हें झालें. म्हणूनच शेटजी आपल्यासारख्या अगदीं सामान्य पण माणसांशी इतक्या सलगीनें, मोकळे- पणानें शांतपणाने बोलले! नाहींतर दुसरा एकादा असता, तर बंगल्यांत येऊ दिलें नसतें, मग बोलायची गोष्ट दूरच !" या विचारांनी दादाचें मन भरून गेलें होतें.
 मुलाखतीचें मुख्य काम संपलें, दादा शेटजींचे आभार मानून जायला निघाला. बरीच आतां रात्र झाली होती. पण बोलण्याच्या नादांत आणि दादासारख्या सामान्य पण चाणाक्ष, हुशार, सहृदय, तत्वनिष्ठ, बाणे- दार तरुणाचें बोलणें ऐकण्याच्या नादांत शेटजी तल्लीन झाले होते. दादाचें बोलणें शेटजी ऐकत होते, तें एका सामान्य मजुराचें म्हणून नव्हे, तर आपल्या गिरणीच्या एका घटकाशीं आपलें बोलणें चाललें आहे या नात्यानें !
 दादा जायला उठला ! पण शेटजींनीं पुन्हां बसवून घेतलें. फिरून खाजगी गप्पा काढल्या. रत्नुची, आणि माझी वाखाणणी, आपलें मुलां-