पान:मजूर.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १ ले.

लापशाला हवे आहे म्हणते ! हट्ट घेऊन बसलों तर पीठ कालवून देतें ! मी दिलें तें आज लोटून ! मी आज ताईवर रागवलों आहें !" मी ं बोलायच्या अगोदरच रत्तूनें आपला पाढा आईपुढं वाचला ! त्याचें तें बोलणे ऐकून आईच्या डोळ्यांतून घळघळ पाणी आलें ! पण ती हंसली!
 रत्नु, खरेंच ताई वेडी आहे ! पण तूं खुळा आहेस ! आतां किनई उद्यांपासून मी तुझ्या ताईला दूध द्यायला सांगत जाईन ! उद्यां- पासून माझें दूध रत्नुला देत जा हं !-"
 मी नुसतीच होकारार्थी मान हलविली. पण त्याच वेळीं आई नको म्हणाली, तरी लापशीचा चमचा भरून तिच्या तोंडाजवळ नेला. या- वेळीं ती तक्याला टेकून बसण्याऐवजीं निजली होती. मी चमत्रा भरून पुढे केल्यावर आईची इच्छा नव्हती तरी, पुढें आलेल्या चमच्याला नको म्हणाली नाहीं. तिनें अगोदर पाण्याचा गुळणा करण्यास पाणी मागितलें. थोडेसे पाणी मी तोंडांत घातलें. तिनें गुळणा केला. मग मी पुन्हा लापशीचा चमचा पुढे केला तो तिनें तोंडांत घेतला. पण तो तोंडातल्या तोंडांत घोळू लागला. घशाखालीं उतरेना. मी दुसरा चमचा वर करून थांबलें. पण आईनें 'थांब' म्हणून हातानेंच खुणविलें. तोंडां- तील लापशी गिळण्यासाठी आई एकसारखा प्रयत्न करीत होती, पण तिचा इलाज चालेना. शेवटीं घशाचाली जाण्याऐवजीं तोंडांत गेलेली लापशी तोंडाबाहेर आली ! - पुन्हां आईला चूळ भरण्यास तोंडांत पाणी घातलें -
 " नकोच या वेळीं तुझी लापशी, सुगंधा !" आई उगारली. "अगर्दी जुलूम होतोय बघ ! "
 "बरें तर थोडें पाणी घे हवं तर ! " म्हणून मी पाणी पुढे केलें. दोन घोट पाणी मात्र घेतलें. पाणी घेतल्यावर किंचित्शी तिला हुशारी आल्यासारखी वाटली. मग तिनें नीट निजवायला सांगितलें. तिला नीट निजविलें. तिच्या अंगावरचें पांघरावयाचें बदललें आणि जवळ बसलें. रत्नु पायथ्याशीं कांहीं तरी खेळण्याच्या नादांत गुंतला होता. आईची वृत्ति नेहमींहून मला आज निराळी दिसत होती. तिची दृष्टी एकसा- रखी घरांतून इकडे तिकडे पहात होती. त्या पाहण्यांतला हेतू कळत