पान:मजूर.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मजूर

फुलवला. पातेली पाणी घालून वर ठेविली, साबूदाणा, साखर, दूध जवळ घेतलें. जितक्या लवकर लापशी होईल, तितक्या लवकर पाहिजे होती, म्हणून माझा जीव अगदीं खालीवर होत होता.
 पुन्हा आईनें हांक मारली.
 " आलें हं आई ! इतक्यांत लापशी घेऊन येतें. तोंपर्यंत तहान मार!-"
 "रत्नु कुठे आहे ग ? - त्याला हांक मारायला सांगत होतें. "
 रत्नु चाळीच्या खालच्या मजल्यावर आपल्या सवंगड्याशी खेळत होता. चुलीवरचें पाणी तापत होतें. तोंवर खालीं जाऊन रत्नूला बोलावून घेऊन आलें. त्याला आईजवळ बसायला सांगितलें. मुलखाचा अचपळ तो. घटकाभर कांहीं एके ठिकाणी बसायचा नाहीं. आतां दिखील तसेच झालें असतें, पण मी त्याला दटावून आईजवळ बसायला लावलें होतें. आईनें त्याला जवळ घेतलें. पाठीवरून हात फिरविला. लुच्चा, अजूनसुद्धां माझ्याजवळ बसावसं तुला नाहीं का वाटत ? - उद्यां जर मी - " पुढचे शब्द आईच्या तोंडांतल्या तोंडांतच राहिले. पण त्याच वेळीं तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले! तें पाहतांच माझ्या हृदयांत चरं झालें ! माझ्या ध्यानांत येण्यापूर्वीच आईनें आपल्या हातांनीं डोळे पुसले. रत्नु आईच्याजवळून निटसण्याची खटपट करीत होताच. लापशी झाली, मी आईजवळ घेऊन गेलें.
 "आई, लापशी घेतेस ना एवढीशी ? - ऊन ऊन आहे तंवर घे म्हणजे बरे पडेल ! "
 " नको मला बाळ, तुझी लापशी ! "
 कां ग ? - तहान लागली आहे ना तुला ? लापशी घेतलीस म्हणजे तहानमोड होईल, नी मग पाणी प्यालं तरी चालेल ! - "
 पण मला आतां पाणीसुद्धां नको ! – "
 " कां ? – "
 'बाळ, रत्तूनें कांहीं खाल्लं आहे का ग ? - त्याला आज दूध दिलेंस का ? –
 " होय ! दूध देतें आहे ! - आई, ताईटली मोठी वाईट आहे बघ ! ती मला आतांशा दूध देत नाहीं. मागितलं तरी नाहीं म्हणते.आईच्य ।