पान:मजूर.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १४ वे

१४५

कांहीं पुसूं नका ! मी तर त्यांच्या सांगण्यावरून तुम्हांला भूतराक्षस, हैवानच समजूं लागलों होतों. पण माझ्या बबीनें, आणि भाईनें आप ल्याबद्दल चांगली माहिती दिली - आतां तर काय खाली झाली !- पहा असे होत असतें ! मजुरांचा पाठीराखा -वाली- पुढारी कोणी तरी पाहिजे आहे ! - " शेटजी थोडेसें बोलले !
 " झाले आहेत, पुढारीही झाले आहेत. आणि त्यांच्याच कृपेनें आम्हां मजुरांना ही संपाची शिस्तवार चळवळ उत्पन्न करतां आली, आणि इतक्या रीतीने चालवितां येत आहे ! आमच्या पुढाऱ्यांनी इथेंच काय पण केनिया, आणि मॉरिशससारख्या ठिकाणीं हालअपेष्टा सोसणाऱ्या आम्हां मजूरबंधुंच्याबद्दलही जोरानें प्रयत्न चालविले आहेत. त्यांनीच आम्हांला जागृत केलें आणि स्वस्थिती वेशीवर टांगण्यास शिकविलें. त्याच पुढाऱ्यांनीं आपल्या अंगावर खादी चढवून तिला प्रतिष्ठा आणिली आहे ! केवळ बाह्य पोषाखाच्या विषमतेनें मजुरांना आपल्याजवळ- आपल्या पुढे यावयाची पंचाईत पडत होती ती खादीने नाहीशी केली ! आतां आपण असे विचारलें कीं, मजुरांच्याकडे दुर्लक्ष केलें, आणि त्यांच्या मागण्या फेटाळल्या तर काय होईल ? कोंडलेल्या मांजराला निरु- पाय होऊन जशी कोंडणारावर झडप घालाविशी वाटते, तो प्रकार ' मजूर ' करतील ! शेटसाहेब, क्षुधा आणि दारिद्य प्राणिमात्राला काय करावयाला लावणार नाहींत ? इतउत्तर गिरणीवाल्यांनी मजुरांच्या बाब- तींत जर असाच निष्काळजीपणा, बेफिकीरपणा, आणि डोळे झांक चाल- विली, तर दारिद्याच्या आणि भुकेच्या भट्टींत पडून तावून निघालेले मजूर तुमच्या डोळ्यावरील कातडें दूर करण्यास क्षणाचाही विलंब लाव- णार नाहींत ! दारिद्यानें व क्षुधेनें गांजलेल्या मजुरांपुढें तुम्हीं कसा टिकाव धरणार ? मजूर तुम्हांला भिणार नाहींत, की सरकारालाही भिणार नाहींत ! मजुरांच्या कल्याणांत गिरणीवाल्यांचेही कल्याण आहे, आणि त्यांच्या अकल्यणांतच गिरणीवाल्यांचे अकल्याण आहे, हें मजु- रांचे लक्षांत यावें आणि गिरणीवाल्यांच्या लक्षांत येऊ नये, किंवा त्यांनी
 म...१०