पान:मजूर.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
मजूर

राम शेट म्हणाले. यावर दादा किंचित् हंसला. आणि म्हणाला मी माझ्या कल्पनेप्रमाणें सांगेन. पण शेटजींना सर्वच पटतील, याची हमी मला घेता येणार नाहीं ! - पहिलें. मजूरांची मागणी अत्यंत सयुक्तिक आणि मर्यादित आहे. त्यांची पगार वाढ, त्यांच्या एक वेळच्याऐवज दोन वेळ म्हणजे पोट भरण्यास त्यांचीच ओलीकोरडी भाकर खायला त्यांना मिळावयाची आहे. कामाचे तास कमी करण्याची मागणी तरी मनुष्याला आल्या जगांत चार दिवस जास्त जगावेसे वाटते, कधींना कधीं आपल्या आयुष्यांत सुखाचे क्षण आपल्याला मिळतील ही आशा असतेच असते ! जनावरांपेक्षाही जास्त काम करून कशी तरी आल्या दिवसाची गुजराण करायची, यापेक्षां जगांत 'मजूरांना' कांहीं आहे, आणि तें मिळावें, असें वाही नये का ? हक्काचा बोनस मिळण्यानें मजुरांना, आणि त्यांच्या बायकामुलांना, कशीतरी जाडीभरडी त्यांची पिढीजाद खादी मिळ- वितां येण्यासारखी असते- त्यांतच, त्या मजुरांच्या देशावरील शेतवाडीचा सरकारदस्त, वर्षदोन वर्षाकांठीं अवर्षणाने दुष्काळ पाडला तरी भराव-. याचा असतो, तो भरावयाला मिळतो ! नाहीं तर, वाडवडिलांनी मिळ• विलेली जमीन सरकारदस्तापायीं सरकारच्या नाहीं तर सावकाराच्या घरीं जायची धास्ती असते ! झालें. आणखी काय पाहिजे ? मजुरांच्या रास्त मागण्या कबूल केल्या तर मजूर कस वागतील म्हणून विचारलेंत ? पोट भरल्यावर ढेकर देणारा आत्माराम जेऊ घालणाराला आशिर्वाद दिल्या- शिवाय, शुभचिंतल्याशिवाय राहील काय ? मजुरांना आपल्यापर्यंत आज. वर ' आपण व प्रत्यक्ष मजूर' यांच्यामध्यें जो आपला अधिकारी वर्ग नेमलेला असतो, त्यानें येऊंच दिलें नाहीं. मजुरांच्या कागाळ्या आपल्या कानावर घातल्या नाहींत ! हेंच खरें आहे ! त्या अधिकारी वर्गानें मजु- रांना तुडवून, छळून, गांजून, आपली चैनचमन चालविली, आणि धन्याचा फायदा त्याच्या पदरीं बिनबोभाट टाकला, म्हणजे झालें, असेंच समजणारा आपला अधिकारी वर्ग असतो !"
 " म्हणजे आमच्या खुशालचंद मॅनेजरप्रमाणेंच ना ? होतं खरें बुवा आमच्या हातून असें एकादे वेळीं ! तुम्हीं संपांत शिरल्याची मॅनेजरनें वर्दी दिली, आणि अवास्तव माहिती देऊन मला जें कांहीं भिववलें, तें