पान:मजूर.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १४ वे.

१४३

"होय ! आणि मी आपल्याला आपले मूल म्हटलें आहे ?" शेटजींनीं म्हटलें.
 " शेटसाहेब, आपल्यासारखीं, आणि भाईसारखी माणसें फारच कचित् ! भाईही मागल्या एका वेळीं असेंच म्हणाले होते ! आम्हीं आपले मजूर आणि आपण आमचे मजूर ! शेटसाहेब, आपल्याकडून असे उद्गार कधीं ऐकायला मिळाले नसते, तर आपल्या पुढे मी इतका • स्पष्ट, निर्भीड, आणि सडेतोड बोललो नसतों, कीं, माझ्या माथे फिर- लेल्या मजूरभाईना दगडधोंड फेकण्याच्या लूटमार करणाच्या अत्याचा -रापासून शिकस्तीने परावृत्त करण्याच्या भानगडीत पडलो नसतों ! "
 शेटजी, आणि दादा यांचे बोलणें ऐन रंगांत येत होतें. बबूताईला ऐकायची इच्छा होती. पण शेटजी तिला जाग्रण करूं देत नसत ! त्यांनी तिला, आणि भाईलाही उठवून झोपायला जायला सांगितले होते. शेट- जीच्या सागण्याप्रमाणे दोघेही उठून झोपावयाला गेली ! दाघाचें-शेटजी •व दादा याचे-बोलणें चालूच होतें !
 तुमची शिस्त, तुमचा समतोलपणा, तुमचा पोक्त विचार, तुमची लोकावर विश्वास टाकण्याची आणि लोकांच्या मनांत आपल्याविषयी आदरयुक्त विश्वास उत्पन्न करण्याची हातोटी, माझ्या दृष्टीनें तर निःसंशय वाखाणण्यासारखी आहेत ! आतां मला हें सांगाल का ? मजुरांनीं तींत . निकराच्या मागण्या केल्या आहेत, त्या कां ? कितपत सयुक्तिक आहेत ? आजपर्यंत कमीच हैं संपाचे बंड उपस्थित झाले नव्हतें, आणि आतांच कसें झालें ? आजवर आम्हांला 'मजूर' वर्ग दिसलाच नाहीं, याला कांहीं आमच्या आळसा शिवाय व हलगर्जीपणा खेरीज दुसरी कारणे आहेत काय ? 'मजूर' आतांपर्यंत इतकी हालाकी असून आमच्यापर्यंत कसा आला नाहीं ? 'मजूर' म्हणविणान्याला कुठे तरी थोडी बहुत शेतवाडी असते की नाहीं? - मजूराच्या मागण्या आम्हीं कबूल केल्या तर अजून आमच्याशी सहानु- भूतीनेंच वागतील कशावरून ? आणि समजा घटकाभर, मजुरांच्या . मागण्या फेटाळून लावल्या तर काय होईल ? या सर्वांचा सांगोपांग विचार तुम्ही केलाच असला पाहिजे. आणि तुम्हीं ते शक्य तितकें थोड -क्यांत, स्पष्ट, आणि मुद्देसूद सांगाल अशी माझी खात्री आहे !" इच्छा-