पान:मजूर.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
मजूर

त्या प्रश्नाच्या उत्तराला अनेक बाजू आहेत; त्या सगळ्या मला आप- ल्याला सांगतां येण्यासारख्या नाहीत ! "
 " जाऊं द्या. द्या. सोडून. ज्या प्रश्नांनीं तुम्हांला त्रास-क्लेश होतील, त्यामी विचारीत नाहीं ! -परवां आपल्या मातुः श्रींच्या अत्यंविधीचें म्हणालांत, - त्यानें काय केलंत ? या प्रश्नानं आपल्याला राग येत नसेल, सांगायला तुम्हांला कांहीं हरकत नसेल तर मी आपल्याला विचारतों हें ! " शेटजी शांतपणे व मधुरवाणीनं बोलें !" आमच्या बबुमुळे आपला आमचा चांगला परिचय होता, तेव्हां-"
 " होय शेटसाहेब ! पण तत्वाकरितां मला तें पसंतच पडलें नाहीं. आणि बबूताईच्यामार्फत तशी माझी सोय खास झाली असती, तरी मला ती नको होती ! त्यापेक्षां ज्या माझ्या मजुरांच्या कायमच्या सुवाच्या कल्याणासाठीं, मी मजुरांचा प्रश्न हार्ती उचलून धरला, त्या मजुरांनीं आपल्या एक दिवसाच्या एक वेळच्या -चणे कुरमुयाला फाटा देऊन माझ्या आईच्या अत्यंविधीसाठी चार- दोन आण्याप्रमाणे वर्गगी केली, ती थोड्याशा तरी अधिकारानें, आणि निःसंकोच मनानें घ्यावीशी वाटली ! आणि मी तीच घेतली ! मी मजु- - रांचा बंधु आहे, मजूर माझे बंधु आहेत. जी त्यांची स्थिती तीच माझी ! जी माझी मीठभाकर तीच त्यांची ! याच तत्वानें शेट साहेब, यावेळी मी माझ्या भावंडांना आपल्याकडे बबूताई अत्याग्रह करीत अस तांनाही पाठविलें नाहीं ! हे मी बबूताईजवळ बोललों होतों. आणि मघाशी आपण विचारलें असतांना, याचमुळे त्यावेळी मला उत्तर देतां आलें नाहीं ! " दादानें उत्तर दिलें.
 'शाबास संतुराम ! शाबास तुमची ! तुमच्यासारखीं बाणेदार माणसें पाहिजेत. मला आपला बाणा फार पसंत पडला. या आपल्या बाण्याचें कधींना कधतरी चीज झाल्याशिवाय राहणार नाहीं, आपल्या अवि- श्रांत, व ऋषकष्टाला मधुर फळेंही पण खात्रीने येतील ! आपण मजु- रांच्या बाबत बराच सूक्ष्म विचार केला आहे यांत शंका नाहीं ! " शेटजी म्हणाले.
 शेटसाहेब मी मजूरच आहें ! " दादा उत्तरला.