पान:मजूर.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १४ वे.

१४१

तुमच्याच मजुरांच्या पायांवरून नेहमीं जात असतात ! तरी आपल्याला दाद असत नाहीं! त्या मजुरांच्या पायाचा आपल्या मोटारीला सार्वजनिक रस्त्यांत अडथळा आला म्हणून भर रस्त्यांत आपणच त्या निरपराधी मजुरांच्या पाठीची चामडी लोळवितां ! " दादा थोडा वेळ थांबला ! शेट- जींना दादाच्या थांबण्याचं आश्चर्य वाटलें. ते म्हणाले-
 " खरोखरच मजुरांची अशी स्थिती असते ? खरेच ते अर्धपोटी असतात ? "
 "शेटसाहेब, खरें म्हणून काय विचारतां, जो हा संतुराम आपल्याशीं बोलतो आहे, ज्याला आपण आपल्या मुलाप्रमाणें समजला आहांत, तो आपल्या गिरणींत पांच वर्षे काम करीत आहे, मजूर - मजुराचा मोकदम म्हणून काम करीत आहे. पण शेटसाहेब, आपल्या गिरणींत बारा तास राबून मला माझ्या कुटुंबांतील साडेतीन माणसांचे पोट भरतां आलें नाही ! महिन्याकाठी चार दिवस आम्ही सगळीं एक भुक्त राहिल्या- खेरीज सोयच नव्हती आणि नाहीं ! आज, माझ्या घरी दोन दिवसां- पेक्षा जास्त दिवसांची बेगमी नाहीं, कीं काल आई स्वर्गवासी झाली, तर माझ्या कडोसीला तिच्या अंत्यविधीला एक पैसा नव्हता! मी मोकदम असून ही माझी स्थिति ! मग माझ्या हाताखालच्या मजुरांची काय देना असेल बरे? त्यांना एकदां तरी दिवसांतून धडपणीं खायला मिळत असेल काय? कीं आपला पगार पुरत असेल ? " दादा हें अगदी त्वेषानें उचं- बळून येऊन बोलत होता !
 संतुराम, दादा थांबल्यावर शेटजींनीं असं एक विचारले, "राग येऊ देऊं नका, किंवा गैरसमजही करून घेऊं नका; पण मी आप- ल्याला असें विचारतों- आहे हें वाईट आहे, हें अपण दोघही कबूल करूनच चाललो आहों, आणि चालू या - मी दुसरें एक आपल्याला असें विचारतों की, आपल्याला, नुकतेच मोकदमीवरून वर ऑफिसांत घेतलें असतांना - हायग्रेड दिली असतांना-"
 " आग लागो त्या हायग्रेडला ! " दादा मध्येच संतापून म्हणाला, शेटसाहेब, माफ करा ! मला त्याबद्दल एक अक्षरही विचारू नका !