पान:मजूर.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
मजूर

ज्यांच्या श्रमाच्या पैशांनीच तुमचीं प्राते चांदरात झडत असते ! ज्या मजुरांच्या प्राणाला पिळवटून आपल्या हाती पाण्यासारखा पैसा खेळत असतो, तो नाचरंग, बैठकी, मजरशांत उडत असतो ! ज्यांनी आपले प्राण डोळ्यांत आणून क्रोडो रुपयांचा फायदा आपल्या हातीं दिला असतो, त्यांतून हजार पांचशांच्या नोटांच्या सिगार्स करून, धूर करून तुम्हांला मोकळे होतां येतें, त्या मजुरांची स्थिति कशी असते - काय असते, याचा दादपत्ता आपल्याला असूं नये, आपण पुसतपास करूं नये, या पेक्षां लांच्छची गोष्ट कोणती ?
 शेटसाहेब, हीं ' मजूर' म्हणून असणारी माणसें चालती बोलतीं आपल्या सारखींच माणसें असतात, इतकें तरी आपल्या ध्यानीं मनीं येतें काय ? तॉ माणसंच असतात हा ! शेटसाहेब, तीं माणसंच असतात ! त्यांना डोकें असतें ! मेंदू असतो. त्यांना बायका, मुलें, आप्तेष्ठ, सगे- सोयरे, आई बाप असतात ! त्यांना खायला माणसांचेंच अन्न लागतें, माणसांना लागणारे वस्त्रच त्यांना त्यांची लाज राखायला-त्यांचें थंडी वाऱ्यापासूनच रक्षण करायला लागतात ! अस ते मजूर आहेत ! हेच मजूर आपल्या गिरण्यांचा प्राण असतात ! हेच मजूर आपल्याला, बंगले, गाड्या, घोड, मोटारी आणि जगांत सर्व ऐश्वर्य प्राप्त करून देतात ! आतां त्या मजुरांच्या स्थिति कडे पहा जरा !
 जो मजूर बारा तास तुमच्या गिरणीत उन्हांत, पावसांत थंडीत पांठ्या टाकीत असतो, त्याला रोज मुरा किनी आपण देतां ? तर जेमतेम त्या मजुराला एक वेळ कशी तरी भागवितां येईल इतका ? मग त्याच्या अंगावर अहे की नाहीं, त्याला, त्याच्या बायका मुलांना दुखणेंचा णें याची चौकशी तर दूरच ! मजुरांना निजायबसायचा जागा घेण्याची- ऐपत मग कशी असणार ? त्यांतच पोटाला चिमटा घेऊन वीसवीस पंचवीस पंचवीस मजूर एक अगदी अगदीं लहान, पांचफूट लांब - चारफूट रुंदीची खोली जेवणाखाण्यापुरती घेत असतात ! हेच मजूर शेटसाहेब, आपल्या गिरण्यांतून दमून भागून आल्यावर, आपल्याला दुवा देत, सार्वजनिक सडकला उघड तर उघडे पडतात ! पाहिलें आहे का कधों हैं ? आपल्या मोटारी, त्या सार्वजनीक रस्त्यावर झोप घेणाऱ्या