पान:मजूर.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १४ वे

१३९

ण्याची वाट पहावयाची ?" शेटजींनीं सहज म्हटलेल्या 'लवकरच्या " मोघमपणाचा झटका दादाला सहन झाला नाहीं !
 संतराम, संपाचा विषय निघाल्याबरोबर, आपण फार तापतां असें दिसतें ! मला वाटतें, गिरणीवाल्यांना खाऊं का मिळं असें ' मजुरांना ' झालें असेल, होत असेल ! संतुराम, इतक्या संतापाच्या भरांत, संपाच्या ठिकाण, तुम्हीं आमच्यावर दगड फेंकणार होतां म्हणून ऐकलें होतें. फेंकले नाहींत ही गोष्ट सोडून द्या. पण फेंकले असते तर कांहीं नवल नव्हतें ? " शेटजींनीं सुरवात केली.
 " खरेंच नवल नव्हतें ! शेटसाहेब, व्यक्ति संबंध सोडून द्या. पण आपण जर डोळे उघडून लाख्खों मजुरांच्या दैन्याकडे, दारिद्र्याकडे, अन्नान्नदशेकडे पहाल, किंवा पाहिलें असतें, तर मजुरांना आपल्यावर दगड फेकले नाहींत, या बद्दल परमेश्वराचे आभारच मानले असते ! मजु- रांनी आपल्यावर दगड फेंकले असते, तर तें त्यांना सर्वस्वी क्षभ्यच होतें असे आपल्याला कबूल करावें लागलें असतें ! शेटसाहेव, मजुरांच्या स्थितीची आपल्याला कांहींही कल्पना असूं नये, मजुरांचेच अनेक जन्माचें दुर्दैव दुसरें काय ? "
 संतुराम, " शेटजी बोलले, " खरोखरच 'मजुरां'च्या बाबतीत आम्हांला वस्तुस्थितिची माहिती असत नाहीं. आमच्या कानावर कधीं येत नाहीं. आम्हीं कधीं त्या बाबत विचार करीत नाहीं, आणि करण्याचे कारण पडत नाहीं ! "
 " हर ! हर ! कोण शोचनीय स्थितिही ! ज्या आपल्या गिरण्यांत हजारो मजुर रात्रंदिवस राबतात, ज्यांच्या हाडाची कार्डे, आणि मांसा- रक्ताची माती आपल्या गिरणींत खपून होत असते, ज्या मजुरांमुळेच, आपण वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा फायदा घेतां ज्यांच्या श्रमावरच, आपल्या टोलेजंग अनेक इमारती उभ्या राहतात, ऐश्वर्यं भोगावयाला सांपडतें, ज्याच्या जिवावर, आपल्या मोटारीवर मोटारी उडत असतात, आपल्याच बरोबरीच्या खुशालचेंडू स्नेह्यां सोबत्यांना लाखों रुपये खर्चून गार्डनपाट झडत असतात ! ज्या मजुरांच्याच प्रत्येक घामाच्या थेंबा- पासून मिळालेले रुपये घोडयांच्या शर्यतींतून चक्काचूर करायला मिळतात;