पान:मजूर.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
मजूर

बापाजवळ भांडायचे नाहीं-खायचा हट्ट घ्यायचा नाहीं, तर कोणाजवळ? माझ्या बबीनें, नेहमीं तुमच्याबद्दल सांगून सांगून तुमच्या बदलची मला चांगली सहानुभूती वाटावयाला लावली आहे ! आपलें चांगलें व्हावें अशी माझी मनापासून इच्छा आहे. आपले चांगले होईल असा मला भरंवसा आहे ! आणि आपलें चांगलें करीन, असें माझें आपल्याला आश्वासन आहे !”
 शेटजॅच्या या शब्दांनीं बबूताईचे डोळे पाण्यानें डबडबले, इकडे दादानें उपरण्यानें आपले डोळे पुसले !
 " आम्हां गरीब मजुरांवर शेटजीची इतकी कृपा आहे, याबद्दल शेट- टर्जीचे उतराई कसें व्हावें, हेच मला कळत नाहीं ! आणि शेटजींच्या कृपाछत्राचे आभार कोणत्या शब्दानें मानावे हें समजत नाहीं ! दादा उगारला. " शेटजींच्या सारखे सज्जन जर कांहीं तरी गिरण्यांचे मालक नसते, तर संपाच्या शेवटाची आशाजनक आशा आम्हां मजुरांना करा- यही कारण पडलें नसतें ! "
 हो, संतूराम, ” मजुरांचा आणि संपाचा विषय दादाकडून निघ- तांच, शेटजी म्हणाले, आणि दादानेही तेवढ्या करितांच-शेटजींन मुलाखतीच्या मुद्यावर यावें म्हणून खाजगी विषयाचा समारोप कर- ण्याची अप्रत्यक्ष सूचना दिली होती. "तुम्हांला सांगावयाचें म्हणजे संपाचा - समाधान कारक निकाल लौकरच लावण्याचें निश्चित झाले आहे !"
 समाधाकारक कोणाला ? आपल्याला कीं, आम्हांला ? " दादाने खींचून प्रश्न केला.
 " दोघांनाही । " शेटजींनीं गालांत किंचित हंसून उत्तर दिलें.
 " निकाल केव्हां लागणार आहे ? दादानें विचारलें !
 "लवकरच ! " शेटजी उत्तरले !
 "लवकरला याला कांहीं मर्यादा आहे का ! शेटसाहेब, श्रीमंतांचा डोळा उघडेपर्यंत गरीबांचे प्राण जाताहेत ! गरीब मजुरांनों अन्नपाण्या- शिवाय किती दिवस जगायचें ? किती दिवस मोठ्याचे ' लवकर' संप-