पान:मजूर.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १४ वे.

१३७

सरळ, पण शेंडा थोडा जाडच ! भालप्रदेश विस्तीर्ण, कानाचीही ही ठेवण तशीच प्रमाणबद्ध !
 दादाच्या अंगावर सगळी खादी होती, तर शेटजी, भाई, आणि बबूताई या तिघांनी पण खादीनेंच आपल्याला भूषविलें होतें ! असल्या वैभवसंपन्न दिवाणखान्यांत खादीचें स्वागत म्हणजे दृष्टीप्रमाणें मनाची, आणि भावनेची चांगलीच सात्विक इच्छापूर्ति होती म्हणण्याला हर- कत नाहीं !
 "आपल्या विषयच्या पुष्कळ चांगल्या चांगल्या गोष्टी आमची बबी मला सांगते ! " शेटजींनीं सुरवात केली, "भाईनेंही मला एकदोन वेळां सांगितलें. परवां संपाच्या दिवशीं गिरणीवर मला प्रथम तुम्हांला या दोघांनी दाखविलें. त्याच्या अगोदर खुशालचंदाबरोबर इथें एकदां दोनदां आला होतां तुम्ही, पण मी नव्हतोंच ! तुमची मातुः श्री दोनतीन दिव- साखाली निर्वतल्याचें कळलें, वाईट झालें ! " शेटजी थांबले, त्यांनीं निःश्वास सोडला ! दादानेही खालीं पाहून दीर्घनिःश्वास टाकला !
 बबूताईं किंचित् उदास झाली ! भाई सर्वेकडे सहानुभूतीच्या नजरेनें पहात होता.
 "तुमच्या बहिणीला - आमच्या बबीच्या मैत्रिणीला, आणि तुमच्या त्या छोट्या भावंडाला आमच्याकडे पाठविलें असतें, तर चाललें असतें. बची तर सारखा हट्ट घेऊन बसली होती ! तुमचा छोटा भाऊ -काय त्याचें नांव ! रत्नु ! हो रत्नु छान आहे मुलगा ! हुशार आहे ! चांगला निघेल पुढे ! बेटा कुणाजवळही राहतो ! माझ्याबरोबर एकदां दोनदां मोटारीतून आला होता एकटाच ! रडला नाहीं कीं कांहीं नाहीं ! मुलांना का नाही आमच्याकडे पाठविलेत ?-"
 दादा कांहीं बोलला नाहीं. शेटजींकडे पाहून पुन्हां खालीं पाह्यला लागला. दादा काय उत्तर देतो हें ऐकण्यासाठीं बबूताई किती उत्कंठीत झाली होती !-"
 " संपाचा प्रमुखपणा तुम्हीं आपल्याकडे घेतला म्हणून की काय बुद्ध- लांत ? अहो, त्यांत काय ? हें चालायचेंच ! संपाचा व्यवहार निराळा ! हैं खाजगी निराळें ! तुम्हीं झालां तरी आमची मुलेंच आहांत ! मुलांनों