पान:मजूर.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
मजूर

कारांचीं उत्तमोत्तम भव्य चित्रे टांगलीं होतीं, तशींच पाश्चात्य अनेक विख्यात चित्रकारांच्या हातची डोळ्याला आणि मनाला थक्क करून टाकणारी अनेक चिलें, त्या दिवाणखान्याची शोभा वाढवीत होती !
 दिवाणखान्याच्या मध्यभागी अष्ठ लु, चांदीच्या नक्षीदार पायाचीं, संगमरवरी दगडाचीं मनोहर टेबलें अगदीं प्रमाणशीर पद्धतीनें ठेविलीं असून, त्यावर शेटजीचे कामाचे कागद, वर्तमानपत्रे, पेपररॉक, काचेच्या बहुमोल किंमतीच्या दौती ! चांदीच्या होल्डरचे - आणि गोल्डानिबचे सुबक टांक चांदीच्याच शोभिवंत स्टँडवर व्यवस्थेनें ठेविले होते !
 सारांश, दिवाणखाना इच्छारामभाईसारख्या वैभवशाली माणसाच्या हौसेला साजण्यासारखाच होता ! आणि यावेळी विद्युत्तेजाच्या भरपूर झगझगटानें त्या दिवाणखान्याची रमणीयता, वैभव, आणखीच कांहीं खुलून दिसत होतीं !
 दादा वर जाण्याबरोबर इच्छामभाई शेट किंचित् खुर्चीवर मागें रेलले होते, ते सांवरून नीट बसले, आणि जिन्याजवळच्या कोच कडे बोट करून या बसा ." असे आदरपूर्वक दादाला म्हणाले ! दादा शेटजींनीं दाख- विलेल्या कोचावर बसला. प्रेमचंदभाई, आणि बबूताई पण आपआपल्या जागीं सावरून बसले.
 " बरोबर वेळेला आलांत !" इच्छारामभाई दादाकडे पहात म्हणाले,
 " आम्ही आपली आतां अपेक्षाच करीत होतों. आपण येण्यापूर्वी आम्हीं तिघेही तुमच्याच विषयीं बोलत होतों ! "
 शेटजींच्या प्रत्येक शब्दांत दादाला आपल्याविषयीं ओतप्रोत सहानु- भूती आढळत होती ! दादा कांहींच बोलला नाहीं. आणि शेटजींच्या बोलण्यावरून दादानें कांहीं उत्तर दिलें पाहिजे असंही नव्हते !
 शेटजींचा चेहरा भव्य, उमदा, प्रशांत, प्रेमळ असा दिसे. त्यांचे बहुतेक केश शुभ्रच झाले होते. त्या त्यांच्या केसांना शुभ्रवर्ण देखील शेटजीच्या ठिकाणची भूतमात्राविषयींची स्निग्धताच दाखवीत होता ! भाईची तर काय छोटी शेटजींची प्रतिमाच होती ! शेटजींच्या प्रमाणेच भाईचा वर्ण तांबूस गौर, गालफुगीर, डोळे मोठे, आणि पाणीदार ! नाक