पान:मजूर.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मजूर
प्रकरण १ लें
आईचा आजार

 "सुगंधा, सुगंधा, कुठे आहेस बाळ ! ये बरें, तहान लागलीय !- अयाई ! पाणी हवं आहे ! बाळ, झोंप कां लागली आहे ? - रत्नु, अरे रत्नु--"
 आईची हाक ऐकून मी खडबडून जागी झालें ! तोंडावर अभ्यासाचें पुस्तक तसेंच उघडलेलें होतें तें घात्रया घाबच्या उठतांच पुस्तक का बाजूला पडलें. तशच उठून आईजवळ गेलें. आईला थोडें घाबरल्यासारखें झालें होतें. आईच्या उशाशीं जाऊन बसलें. तिच्या डोक्यावर हात ठेविला. डोकें बरेंच तापले होतें.

 

" आई ! ” मी हलकेंच हांक मारली. थोड्याशा हाका मारण्याच्या श्रमाने आईला ग्लानी आली होती. तिनें डोळे मिटले होते. माझा शब्द ऐकतांच आईनें डोळे उघडून माझ्याकडे पाहिलें.

." तहान लागलीय ग ! पाणी देतेस का थोडें ? अंगाची कशी तलखी होते आहे ! तोंडाला कोरड पडलीय जास्ती ! -एवढें म्हणून स्वस्थ " राहिली. आईला जास्त बोलवेना.
 "थांब हं आई ! थोडी साबूदाण्याची लापशी करून आणते हूँ" इतक्यांत ! उन्हाची वेळ आहे, त्याने जास्त घाबरल्यासारखें झालें आहे. ' यावर आई कांहींच बोलली नाहीं.' मग लवकर तरी आटोप, ' असें बोलण्याच्या ऐवजी फक्त त्या अर्थाने तिनें माझ्याकडे पाहिलें. मी चुली- जवळ गेलें. चुलींत विस्तव पुरून ठेवलाच होता. उकरून काढला,