पान:मजूर.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १४ वे.
मुलाखत !

 नवाचे ठोके खालच्या दिवाणखान्याच्या मोठ्या घडघाळांत पडले. आणि संतुदादाने 'इच्छागमभाई टेरिसिस' मध्ये पाऊल टाकलें. नवाचा शेवटचा ठोका, आणि संतुदादाचें पाऊल शेटजींच्या दिवाण- खान्यांत एकदमच पडली.
 शेट इच्छारामभाई दादाची मार्गप्रतीक्षा करीतच होते. बाकीचीं सारी कार्मेधा में आटोपून टाकलीं होतीं. दोनघटका निर्बंधपणानें दादाशी बोलायलाचालायला शेटजी अगदीं मोकळे होते ! शेटजी आपल्या शिसवीच्या लाकडाच्या वारनीसने तकाकणान्या, जांभळ्या उंची मखमालीच्या आरामखुर्चीवर बसले असून त्यांच्यापाठीमागच्या तशाच एका उंची कोचावर प्रेमचंद भाई हातांत कसलेंसें वर्तमानपत्र घेऊन ऐस- पैस बसला होता. त्याच्या जवळच्याच सुन्दर वेताच्या ऐटदार खुर्चीवर वबूताई अगदी मोकळ्या अंगानें बसली होती. शेटजींच्या समोरच जिन्याचा कठडा असून तिथैच चांगल्यापैकीं एक प्रशस्त कोच मांड- लेला होता !
 ' इच्छारामभाई टोरिसिस मधला शेटजींचा खास आवडता हा दिवाणखाना असल्यामुळें, याची बांधणी, सजावट अप्रतीम होती यांत काय नवल? प्रत्येक कापऱ्यांत एक नक्षीदार - मोरांच्या किंवा असल्याच कसल्या तरी तिकोनों छोटे टेबल, त्याच्यावर मजेदार कलाकुसरींनीं युक्त काचेचे--मातीचे वगैरे फ्लावर पॉटस् ! प्रत्येक भिंतीला लागून अगदी मध्यभागी अशींच सर्पाकृती पायांची टेबलें, त्यापकों दोहोंवर समोरा- समोर खणा एवढे बिलारी आरसे, आणि दोहोंवर खुद्द शेटजींचा एक आणि त्यांच्या प्रियमृत पत्निचा बबूताईच्या आईचा एक असे दोन तेल्यारंगांचे फोटो ठेवलेले ! वरील सर्व तक्तपोशी अशीच प्रेक्षणीय तयार केलेली होती ! वर सर्वत्र राजा रविवर्मासारख्या प्रख्यात चित्र-