पान:मजूर.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
मजूर

नाहीं. नाहीं तर मी तुम्हांला खात्रीनें दिली असती ! हे चार आणे घ्या, आणि कुठेही विख्या ध्या जा-"
 एक मजूर त्याची टोपी पडल्यावर, व त्याने बोलल्यावर ओळख- ल्याचा आव आणून पुढें आला; व म्हणाला " आँ ? ह्ये तर आमचं मांजरसाव हवका ? रामराम, रामराम, मांजरसाच ! आमी तुमच्या गिरणीतलं गरीब मजूर न्हवका ? काय राव ? त्वांड बी दावाना-आपली बोली बी बोलांना ! मग कसे वळखावं व तुम्हास्त्री ! नव्ह, पर मांजरसाब ? अशा अवक्ताला हीकड कुठें व ? "
 मॅनेजर सुटला ! एकदम त्याच्या जिवांत जीव आला ! त्याला हायसें झालें ! आतां त्याला बळही आलें. आणि बोलायचें अवसान येऊन युक्त्याही आठवू लागल्या. तो म्हणाला, ल्ये काहो, काय रे माझे हाल केलेत ! मी तर तुमच्याकरितां धडपडतोय ! हा आपल्या गिरणीच्या शेटाचा बंगला नव्हे का ! संप लवकर मोडा म्हणून मी शेटाकडे सांगा- यला निघालों आहें ! तुम्हीं गरीब लोक उपाशी मरता-आम्हांला काय तुमची काळजी नाहीं म्हणून समजतां काय ? – "
 "व्य ? जा, जा, जा, मग बिगी बिगी जा ! आमच्यासाठीं खटपट करतायसना! जा मग! मांजरसाब, नवळखून - मुरखपणानें बाईच आमच्या हातनं बिघडलंय त्येबद्दल गरीबावर माफी करावी !! - " एक मजूर हात जोडून पण हंसत म्हणाला !
 खुशालचंद बंगल्यांत शिरला ! मजूर एकमेकांच्या हातावर हात मारीत-मोठ्यांदा ' कशी मांजराची मजा केली ' म्हणून खोखो करून हंसू लागले !