पान:मजूर.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वें.

१३१

वगैरे सांगून त्यांना एक दोन शब्दांत चांगला धीर देऊन दादा बंग- ल्यांत शिरला.
 मॅनेजर, बॉय, इतक्यांत दुरून येतांना मंडळेंना दिसले. पण मजुरांच्या टोळ्यांना पाहून हातपाय गाळले ! कदाचित् आपल्याला ओळखून आपली इथल्या इथें कंबक्ती तर काढणार नाहींत ? पोलिस हेल्पही ऐनवेळेला आपल्याला नाहीं ! बॉय, मजूरांच्या टोळ्या दिसताहेत रे इथें ! " " मग ? " दोघांचीं प्रश्नोत्तरें होताहेत, तोपर्यंत मजूरानी मॅनेजरला वेढलेंही ! आपली झटदिशीं तरी ओळख पटू नये - व परस्थ म्हणून निसटता आलें तर पहावें याकरितां खुशालचंदानें आपली साहेबी टोपी बरीच पुढे ओढली ! मॅनेजरच्या भोंवती वेढा पडतांच पोन्यानें प्रसंग ओळखला, आणि मजुरांच्या गर्दीतून याच्या, त्याच्या तंगड्यांतून शिरत शिरत उंदराच्या पिटकुल्याप्रमाणें डोळ्याचें पातें लवण्याच्या आंत कुठे पोबारा केला कोणाच्या लक्षांतही आलें नाहीं !
 "साब, वाइच विडमिाचिस द्या की ! "एका मजुरानें मॅनेजरपुढें हात पसरला !
 "चल इट् !” करीत अवसान घरून खुशालचंद मार्ग काढूं लागला !
 " असं का करतायसा ! बिडी नसली तर तुमची शिगरट द्या ! आह्मी का हवशी हाय व्हय !" दुसऱ्या मजुरानें सुचविलें !
 " अरे कशाची घेतो ह्यो मर्दा तुह्मास्त्री बिडी न् शिगरट ! गावठी साह्यो ह्यो ! तुमीच द्या त्येला बिडी ! – ”
 "यू ब्लडी फूल ! मुव्ह असाईड !” मॅनेजरला वाटले इंग्रजी बोललें म्हणजे लोक दूर होतील !
 "साह्येब, आपली मन्हाठी बोली बोला कीं ! आह्मास्त्री कां कळतय तुमचें ह्य यस् फ्यस् ! तुह्मांवाणी आम्ही त्यो कराया शिकलं हाय व्हय ?” तिसरा मजूर म्हणाला.
 " अरे त्या गांवठी साहेबाला वाटलें कीं, यस् फ्यस् केलें हांजी आपून भिऊन जाऊं -अन् वाट देऊं ! -पर साह्येब, आह्मास्त्री आतां, या तुमच्या टोपीची, तुमच्या इज्जरीची, अन बुटाची बघा अक्षी भ्या वाटत नाहीं !”